आरोग्य

एका दिवसात किती कॅलरीज आवश्यक, वजनाचं राहणार नाही टेन्शन, समजून घ्या हे प्रमाण

सामान्यतः लोक कॅलरीजना लठ्ठपणासाठी जबाबदार मानतात. पण शरीरासाठी कॅलरीजचं योग्य प्रमाणात सेवन करणं खूप महत्त्वाचं आहे. कॅलरीज म्हणजे आपल्या शरीराला कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा. जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल, तर एका दिवसात नेमक्या किती कॅलरीज आवश्यक असतात.

प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रमाणात कॅलरीजची आवश्यकता असते. ही गरज वय, स्त्री-पुरुष, शारीरिक हालचाली आणि आरोग्यााच्या स्थितीवर अवलंबून असते. जास्त किंवा कमी कॅलरीजचं आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकतात.

शरीरासाठी किती कॅलरीज आवश्यक

१९ ते ५९ वयोगटातील व्यक्तीला दररोज १,६०० ते ३,००० किलोकॅलरीजची आवश्यकता असते. महिलांना दररोज सुमारे १,६०० ते २,४०० किलोकॅलरीजची आवश्यकता असते, तर पुरुषांना दररोज सुमारे २००० ते ३,००० किलोकॅलरीजची आवश्यकता असते. एकूण वापरल्या जाणाऱ्या कॅलरीजपैकी ४५% ते ६५% कार्बोहाइड्रेटमध्ये, २०% ते ३५% फॅटमधून आणि १०% ते ३५% प्रोटीनमधून यायला हवे.

पुरुषांसाठी 

जर तुम्ही व्यस्त जीवनशैली जगत असाल आणि नियमित शारीरिक हालचाल करत असाल तर तुम्हाला दररोज २५०० कॅलरीजची आवश्यकता असते.

जर तुमची जीवनशैली नॉर्मल असेल तर २२०० कॅलरीजची आवश्यकता आहे.

आरामदायी जीवनशैलीसाठी तुम्हाला २००० कॅलरीजची आवश्यकता आहे.

महिलांसाठी

सक्रिय जीवनशैली असलेल्या महिलांना २००० कॅलरीजची आवश्यकता आहे.

नॉर्मल शारीरिक हालचाली करणाऱ्या महिलांसाठी १८०० कॅलरीजची आवश्यकता आहे.

जर एखाद्या महिलेची जीवनशैली खूपच कमी सक्रिय असेल तर १६०० कॅलरीज पुरेशा आहेत.

कॅलरीजचा वजनावर होणारा परिणाम

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला तुमचं कॅलरीजचं प्रमाण कमी करावं लागेल. वजन कमी करण्यासाठी, शरीराला आवश्यक पोषक तत्वं मिळत राहावीत म्हणून निरोगी संतुलन राखून कॅलरीज कमी करणं उचित आहे.

जर तुमचं वजन खूप कमी असेल आणि तुम्हाला ते वाढवायचं असेल, तर तुम्हाला तुमच्या कॅलरीजचं प्रमाण वाढवावं लागेल. यासाठी उच्च कॅलरीज असलेला सकस आहार घेऊ शकता.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता

नवी दिल्ली : NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची देशभर चर्चा रंगली…

7 तास ago

शिवसेना जनतेच्या दारी’ अभियानाचा राज्यभर विस्तार; शिंदेंकडून विकास, जनसेवा आणि युवा सक्षमीकरणाचा मंत्र

नेस्कोतील कार्यक्रमात २० हजार नागरिकांना शासकीय लाभांचे वितरण; दापोलीतील मीनाताई ठाकरे नाट्यगृहासाठी १५ कोटींची घोषणा…

7 तास ago

भांबर्डेतील मंदिर परिसर आणि जुना दहिवडी रस्ता चिखलमय; तातडीने मुरुम टाकण्याची ग्रामस्थांची मागणी

रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे): भांबर्डे (ता. शिरुर) गावातील मंदिर परिसरातील तळ्याच्या भरावावर तसेच जुन्या दहिवडी…

11 तास ago

‘कमळी’ मालिकेत आषाढी विशेष भाग; महाजन कुटुंबातील मोठं सत्य उघड होणार?

मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय 'कमळी' मालिकेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत असून,…

13 तास ago

मक्याचे कणीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर

मक्याचे कणीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मक्यात पोषकतत्वांचा खजिना असल्याने याचे अनेक फायदे शरीरास होतात.…

14 तास ago

वाल्मीक कराड तुरुंगात; परळीच्या राखेतून महाजनकोला वर्षभरात ₹35 कोटींचे उत्पन्न

निविदा प्रक्रियेमुळे अवैध राख माफियांना लगाम; तीन वर्षांतील सर्वाधिक महसूल महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या तिजोरीत…

14 तास ago