आरोग्य

डोळ्यांला आलेल्या सूजेवर सोपे घरगुती उपाय…

खूप जणांना रांजणवाडी होत असते. खरंतर डोळ्यांचा कोणता आजार दुर्लक्षित करू नये. म्हणून रांजणवडी या विषयावर घरगुती उपाय आज सांगणार आहे. अत्यंत साधा सोपा घरातील एक वस्तू वापरून आपल्याला उपाय करायचा आहे. या उपायासाठी आपल्याला लवंग लागणार आहे लवंग आपल्या घरामध्ये असतेच. तुमची रांजणवडी अगदी काही क्षणांमध्ये बरी होईल इतकी शक्ती या घरगुती उपायांमध्ये आहे. घरगुती उपाय आपण समजून घेणारच आहोत पण तत्पूर्वी रांजणवाडी येण्याची कारण काय आहेत ते आपण पाहिले.

प्रतिकारशक्ती कमी होणे अयोग्य आहार-विहार यामुळे शरीरात विषारी तत्व चाटतात जर टाकाऊ पदार्थ बाहेर पडले नाही तर शरीराची प्रतिकार शक्ती आपोआप कमी होत असते. यामुळेसुद्धा रांजणवाडी येते पापण्यांच्या केसांच्या मुळाशी जीवाणूंचा संसर्ग झाला तर रांजणवाडी येत असते तर यावर आपण घरगुती उपाय पाहणार आहोत.

आपण एक कप पाणी उकळायला ठेवणार आहोत. पाणी उकळून झाल्यानंतर कोमट होऊ द्यायचे आहे. या या कोमट पाण्याने तीन ते चार लवंगा उगाळून घ्यायचे आहेत. आपल्याला उगाळून त्याचा लेप तयार करायचा आहे. आपल्याला दिवसातून दोन वेळा या रांजणवाडी वर लावायचे आहे रांजणवाडी ची सूज वेदना जळजळ होणे या सर्व समस्या त्वरित कमी होणार आहेत. काही क्षणातच सर्व समस्या कमी होती आणि हे तुम्हाला निश्चितच जाणवेल. लवंगामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात आणि हा जो रोग किंवा आजार आहे तो जीवाणूंचा संसर्ग झाल्यामुळे होत असतो आणि म्हणून जिवाणू विरोधात लढण्यासाठी लवंग निश्चितच मदत करत असते.

दुसरा महत्वाचा उपाय तुम्ही मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आपल्याला तीन ते चार पेरूची पाने घ्यायची व्यवस्थित मिठाच्या पाण्याने धुऊन घ्या व्यवस्थित परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवा आणि मग त्याला कोरडी करा. एक कप गरम पाणी करा आणि हे पाणी कोमट होऊ द्या. त्या पाण्यामध्ये ही पेरू चे पान बुडवायचे आणि ते पान तुमच्या डोळ्यावर ठेवायचा आहे.

थोडं गार झाल्यानंतर नंतर ते पान डोळ्यावरून काढून टाका आणि दुसरे पान घ्या ते कोमट पाण्यामध्ये बुडवा आणि ते पुन्हा आपल्या डोळ्यावरती ठेवा असे एक एक पान भिजवून डोळ्यावरती ठेवा असे दहा मिनिटं आळीपाळीने पेरुची पाणी कोमट पाण्यात बुडवून डोळ्यावर ती ठेवा अकराव्या मिनिटाला तुमच्या डोळ्यावर आलेली सूज जाईल तसेच खाज वेदना आणि जळजळ थांबणार आहे रांजणवाडी डोळ्याला होणारा त्रास पूर्णपणे थांबणार आहे यामुळे रांजणवाडी ची समस्या बंद होईल. हे घरगुती उपाय करा परंतु त्याबरोबरच पिष्टमय पदार्थ साखरेचे पदार्थ मांसाहारी चरबीयुक्त पदार्थ मसालेदार पदार्थ खाऊ नका. तसेच कॉफी चहा अतिरिक्त प्रमाणात मीठ हे रांजणवाडी असताना असे पदार्थ वर्ज्य करा.

तुम्हाला नेहमी नेहमी रांजणवाडी येण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही कवचफळे धान्य भाज्या व फळे यांचा समावेश आपल्या आहारामध्ये निश्चित करा. त्याच बरोबर डोळ्यांचे व्यायाम करत राहा. डोळ्यांवर ताण कमी होण्यासाठी व्यायाम करा. शरीराची स्वच्छता योग्य आहार आणि डोळ्यांचे व्यायाम करा आपला आरोग्य सुधारा. या गोष्टींचे पालन केले तर रांजणवाडी कधीच. तुम्हाला होणार नाही.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago