आजकाल लठ्ठपणा एक गंभीर समस्या झाली आहे. जास्तीत जास्त लोक लठ्ठपणाचे शिकार होत आहेत. याची कारणेही वेगवेगळी आहेत. चुकीची लाइफस्टाईल, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, एक्सरसाईज न करणे, आनुंवाशिक कारण यामुळे लठ्ठपणा वाढतो. लठ्ठपणा वाढला की, शरीरात वेगवेगळे आजारही घर करतात. लठ्ठपणामुळे डायबिटीस आणि कॅन्सरसारख्या जीवघेण्याचा आजारांचाही धोका असतो. लठ्ठपणापासून बचाव करण्यासाठी आहाराकडे लक्ष देणं फार महत्वाचं ठरतं.
तुम्ही काय खाता-पिता यानेही तुमचं वजन वाढू शकतं किंवा कमी होऊ शकतं. कथावाचक अनिरुद्धाचार्य यांनी सांगितलं की, वजन वाढण्याचं कारण तुमची खाण्याची चुकीची पद्धत आहे. ते म्हणाले की, वजन वाढण्याचं एक मोठं कारण जास्त चपात्या खाणं आहे. ते म्हणाले की, वेगवेगळ्या डाळी आणि भाज्यांचं अधिक सेवन केलं पाहिजे. अनेकदा महिला थोडी डाळ किंवा भाजीसोबत पाच ते सहा चपात्या खातात. ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो.
एक वाटी डाळीने होईल फायदा
तुम्हाला वजन वाढणं रोखायचं असेल किंवा वाढलेलं कमी करायचं असेल तर पाच ते सहा चपात्या खाऊ नका. त्याऐवजी सहा वाट्या डाळीचं पाणी प्यावं. चपात्या केवळ एक किंवा दोनच खाव्यात.
डाळीमध्ये भरपूर प्रोटीन
डाळी वजन कंट्रोल करण्याची एक बेस्ट पर्याय आहेत. पोट भरण्यासाठी चपातीऐवजी डाळीचं सेवन केलं पाहिजे. वेगवेगळ्या डाळीमधून भरपूर प्रोटीन मिळतं. प्रोटीनने वजन कमी करण्यास आणि मांसपेशी वाढवण्यास मदत मिळते.
जास्त भात खाणंही टाळा
भात लठ्ठपणाचं एक मोठं कारण आहे. बरेच लोक जेवण करताना भरपूर भात खातात. जास्त भात खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो. असं करणं चुकीचं आहे. भात थोडाच खावा आणि त्याजागी डाळ आणि भाज्या खाव्यात.
लहान मुलांना द्या मूग डाळ
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आणि शरीर फीट ठेवण्यासाठी डाळीचं पाणी प्यावे आणि लहान मुलांना सुद्धा द्यावं. लहान मुलांना मूग डाळ द्या. या डाळीने शरीराची ताकद वाढते. मूग डाळीच्या पाण्यात भरपूर पोषक तत्व असतात. ज्यातून शरीराल पोषण मिळतं.
डाळीचं पाणी प्रभावी
डाळीसोबतच डाळीचं पाणी आरोग्यासाठी चांगलं असतं. डॉक्टरही डाळीचं पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. याने लठ्ठपणाही वाढत नाही.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…