आरोग्य

कोणत्या लोकांनी चुकूनही पिऊ नये गरम लिंबू पाणी

आजकाल जास्तीत जास्त लोक वजन कमी करण्यासाठी, एनर्जी मिळवण्यासाठी आणि शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी रोज लिंबू पाण्याचं सेवन करतात. लिंबू पाण्याच्या सेवनाने शरीरातील विषारी पदार्थ सुद्धा बाहेर निघतात. सोबतच चेहरा चमकदार होतो आणि मेटाबॉलिज्मही बूस्ट होतं. मात्र, आरोग्यासंबंधी काही समस्या असल्यावर लिंबू पाण्याचं सेवन करणं नुकसानकारक ठरू शकतं.
लिंबू पाणी कुणासाठी घातक
संधिवाताने पीडित लोकांनी लिंबू पाण्याचं अजिबात सेवन करू नये. त्याशिवाय ज्यांना हायपर ॲसिडिटी आणि पित्त दोष आहे अशा लोकांनी सुद्धा लिंबू, मध आणि गरम पाण्याचं सेवन करू नये. तसेच ज्या लोकांची हाडे कमजोर होतात, दात कमजोर असतात त्यांनीही लिंबू पाण्याचं सेवन करू नये. त्याशिवाय तोंडात फोड आले असेल किंवा अल्सर असेल तर त्यांनीही लिंबू पाणी पिऊ नये.
गरम लिंबू पाणी कसं प्याल
जर वरच्या समस्या असलेल्या लोकांना लिंबू पाणी प्यायचंच असेल तर त्यांनी ते हलकं गरम करून प्यावं आणि थोडंच प्यावं. लिंबू पाण्यात मध चांगलं मिक्स करावं. पाणी फार जास्त गरम करू नये. मध कधीच पाण्यात गरम करू नये.
एका दिवसात किती लिंबू पाणी प्याव
लिंबू पाणी पिऊन शरीराचं नुकसान होऊ नये आणि आरोग्य चांगलं रहावं यासाठी ते योग्य प्रमाणात पिणं गरजेचं असतं. एक्सपर्ट्सनुसार, एका दिवसात दोन लिंबाचा ज्यूस प्यायला जाऊ शकतो. २ लिंबाच्या रसात पाणी मिक्स करून सेवन करा. याने शरीराला अनेक फायदे मिळतील आणि नुकसानही होणार नाही.
किडनी स्टोनची समस्या
लिंबामध्ये आम्ल असण्यासोबतच याची ऑक्सलेट लेव्हलही जास्त असते. ज्यामुळे हे शरीरात जाऊन क्रिस्टलही तयार करु शकतं. हे क्रिस्टलाइज्ड ऑक्सलेट तुमच्या किडनीमध्ये जाऊन स्टोन तयार करतं. त्यामुळे आता जेव्हाही तुम्ही लिंबाचं सेवन कराल तेव्हा त्यांच्या प्रमाणावर लक्ष द्या.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

12 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

13 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

13 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

13 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

14 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

14 तास ago