आरोग्य

पापड खा, पण जरा जपून…

पापड हा भारतीय जेवणातील महत्त्वाचा घटक मानला जातो. प्रत्येक राज्यात पापड बनविण्याच्या पध्दतीही वेगवेगळ्या आहेत. राजस्थानमध्ये बेसनाचे, पंजाबमध्ये उडदाच्या डाळीचे पापड बनविले जातात. पापड भाजून त्यावर टोमॅटो, कांदा किंवा तिखट टाकून मसाला पापड आवडीने खाल्ला जातो. मात्र तो पचायला तीन ते पाच दिवस लागतात हे अनेकांना माहित नाही. पापड वजनाला हलके असतात, मात्र पचायला तेव्हढेच अवघड असतात. दोन पापडात एका चपाती एवढी कॅलरीज असतात.

मुळात पापडात टाकला जाणारा पापडखार हा पापडाला जड करतो. ह्रदय, किडनी किंवा ब्लडप्रेशरची समस्या ज्यांना आहे त्यांनी पापड खाणे टाळावे. ज्यांना जास्त ऍसिडिटीचा त्रास आहे त्यांनीही पापडापासून दूरच राहायला हवे. पापड तळलेला खा किंवा भाजलेला, पापड तळल्यानंतर त्यावर मोठ्या प्रमाणात तेल जमते. तो भाजला तर त्यावर आर्किलेमाइड तयार होते, जे एक न्यूरोटॉक्सिन आहे आणि त्याला कार्सिनोजेनही म्हणतात. त्यावर सोडियम बेंझाइटचा प्रयोग यासाठी करतात की पापड जास्त दिवस चांगला राहावा. यामुळे कॅन्सर होण्याचा धोका मात्र वाढतो. धोकादायक म्हणजे पापड खाल्ल्यानंतर पापड पोटातच राहतो. त्याला पचायला तीन ते पाच दिवस लागतात. बाकीच्या अन्नाचे चार तासांत पचन होते, मात्र पापड तसाच राहिल्याने आतड्यांना आराम मिळत नाही.

पापड खाल्यावर अशी घटते आतड्यांची क्षमता

पापड हा रिफाइंड घटकांपासून तयार होतो. बारीक बेसन, मीठ त्यात जास्त असते. त्यात फायबरनसल्याने पचन करताना आतड्यांवर ताण येतो. पाचन रसाबरोबर मिसळल्यावर पापडाचीपेस्ट तयार होते आणि आतड्यांना चिकटते. त्याने आतड्यांची क्षमता घटते.

पापड खाण्याचे तोटे

पापड खूप वेळ आतड्यांमध्येच राहतो. तो आतड्यांमध्ये सडल्याने अनावश्यक बॅक्टेरिया तयार होतात. आतड्यांच्या आत तो नुकसान करू शकतो. आतड्यांचा आजार किंवा ऍसिड रिप्लेक्स आदि तक्रारी सुरू होऊ शकतात. यामुळे आतड्यांची पाचनक्षमता कमी होण्याची शक्यताही निर्माण होते. पापडांमुळे आतड्यांतील व्हिटॅमिन आणि मिनरल्स कमी होऊ शकतात. पापडामुळे आतड्यांमध्ये असलेले इतर खाद्यपदार्थ पचनास अडथळा निर्माण होतो. त्याने पोटाचे विकार वाढू शकतात.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

6 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

10 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

10 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

10 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

10 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

11 तास ago