आरोग्य

उपाशीपोटी खा तुळशीची पान होतील जबरदस्त फायदे

आयुर्वेदात तुळशीला खूप महत्त्वाचं स्थान आहे. तिला औषधी वनस्पतींची राणी म्हणतात. तुळशीचा वापर वर्षानुवर्षे घरगुती उपचारांसाठी केला जात आहे. जर एखाद्याला खोकला असेल तर सर्वात आधी तुळशीची पानं खाल्ली जातात. अनेक आरोग्य समस्यांवर तुळस गुणकारी ठरते. जर तुम्ही १० दिवस उपाशी पोटी तुळशीची पानं खाल्लीत तर तुम्हाला अनेक जबरदस्त फायदे मिळू शकतात. दररोज उपाशी पोटी तुळशीची पानं खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरात कोणते बदल होतात.

तुळशीची पान खाण्याचे फायदे

तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. यामुळे सर्दी, खोकला आणि व्हायरल इन्फेक्शनचा धोका कमी होतो.

तुळशीमध्ये एंजाइम असतात जे पाचक रस एक्टिव्ह करतात. यामुळे गॅस, अ‍ॅसिडिटी, बद्धकोष्ठता, आंबट ढेकर यासारख्या पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो.

तुळशीची पानं खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. त्यामुळे इन्सुलिनची कार्यक्षमता वाढते.

चिंता आणि ताण कमी होते. त्यात एडेप्टोजेनिक गुणधर्म आहेत, जे मन शांत ठेवतात.

तुळशीची पानं खाल्ल्याने तुमचं हृदय निरोगी राहतं. कोलेस्टेरॉल कमी होतं, जे ब्लड प्रेशर नियंत्रित करते आणि त्यामुळे हृदयाच्या आरोग्यालाही फायदा होतो.

कशी खायची तुळशीची पान

दररोज सकाळी उपाशी पोटी ४ ते ५ तुळशीची पानं चावून खा.

तुळशीचं पाणी प्या. यासाठी तुळशीची पानं रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी ते प्या.

तुळशीचा चहा पिणं देखील फायदेशीर आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

19 तास ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

20 तास ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

20 तास ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

20 तास ago

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क; सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांना मतदानाचे आवाहन

बारामती: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा…

20 तास ago

शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरीला; गुन्हा दाखल…

न्हावरे (तेजस फडके): इनामगाव (ता.शिरुर) येथे शेतजमिनीतून दोन विद्युत मोटारी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली…

1 दिवस ago