मधुर-आंबट चवीची चिंच म्हणजे प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या बालपणात आवडता असणारा खाद्य पदार्थ आहे .चिंच अत्यंत रुचीकर असून तिचा वापर थेट औषध म्हणून करता येतो तसेच चिंचेच्या उपयोगाने मुळापासून बरे होतात रोग तर जाणून घेवूया उपयोग.
चिंचेपासून तयार केलेले “चिंचालवण तेल” पोटदुखीवरचे उत्तम औषध आहे.जेवताना भाताच्या पहिल्या घासाबरोबर हे तेल मिसळून घेतले कि पोटदुखीसारखी दुखणी लवकर बरी होतात.
पिकलेली चिंच वातपित्त आणि कफ अशा तिन्ही दोषांचे शमन करते. चिंचेचे सरबत उत्तम पित्तशामक आहे. ज्यांना पित्त वाढून शरीरात उष्णता वाढत चालली आहे असे वाटते त्यांनी एक कप चिंचेचे सरबत उष्णता कमी होई पर्यंत घ्यावे.
तोंडाला चव नसेल तर चिमुटभर मीठ लावून पिकलेली आणि मऊ झालेली चिंच खावी.
हृदयाची ताकद कमी झाली कि पिकून मऊ झालेली काळी चिंच सरबत करून घेतात. हृदयाच्या स्नायूंना ताकद देण्याचे काम चिंच करते.
मुका मार लागून सूज आली कि चिंचोके ( चिंचेच्या बिया ) वाटून त्याचा लेप करावा. चिंचेची पाने आणि चिंचेचा गार यांचाही लेप वेदना आणि सूज कमी करणारा आहे.
काविळी मध्ये खाण्यावरची इच्छा मरून गेली कि रुग्णाला पिकलेली चिंच खायला द्यावी. चिंचेचे सरबत काविळी मध्ये अमृताचे काम करते.
चिंचेच्या फुलांचा ताजा रस नियमित घेतला तर रक्ती मुळव्याध कमी होतो. पचन शक्ती वाढवून आरोग्यप्राप्ती करून देणारी चिंच खरंच एक स्वस्तातले औषध आहे.
चिंचेच्या फुलांचा गुलाबाचा गुलकंद बनवतो तशाच पद्धतीने गुलकंद तयार करावा. तो उत्तम पित्तशामक आहे.
(सोशल मीडियावरून साभार)
थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल,…
केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. केसांना पोषण…
मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील…
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा,…
मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची…
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…