आरोग्य

पाणी पिताना हमखास सगळेच करतात ‘या’ ४ चुका, पाणी पिऊनही तब्येत बिघडण्याचा धोका

आपण शाळेत शिकलो आहोत की ‘जल हेच जीवन.’ माणसाचे शरीर ६० ते ७० टक्के पाण्याचे बनले आहे. योग्य प्रमाणात पाणी पिणे फारच गरजेचे असते. पचनसंस्थेपासून चेतासंस्थेपर्यंत सगळ्याच शारीरिक संस्थांना पाण्याची गरज असते. ऋतू बदलला की शरीरासाठी पाण्याची गरजही बदलते. थंडीच्या दिवसांमध्ये पाणी कमी प्यायले जाते. तसेच उन्हाळा आला की आपण गटागट तांब्याच्या तांबे संपवून टाकतो. तरी पाण्याची तहान काही भागत नाही. प्रमाण कमी जास्त होते मात्र पाणी पिणे ही क्रिया सातत्याने घडत असते.

वजनानुसार पाण्याची आवश्यकता ठरते. मात्र शरीराला रोज सुमारे ३ लिटर पाण्याची आवश्यकता असते. पाणी पिणे ही फारच सामान्य क्रिया आहे त्यामुळे आपण त्याबद्दल फार विचार करत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का? आपण पाणी पिताना चूक करतो. सात्विक मुव्हमेंटची फाऊंडर सुबा सराफ सांगते, जर या चुका टाळल्या नाहीत तर, त्यांचे परिणाम वाईट होऊ शकतात.

१) गटागट पाणी पिणे

कधीकधी घशाला फारच कोरड पडते. मग आपण पाणी गटागट एका श्वासात पिऊन टाकतो. पाणी एकदम पटकन प्यायल्यावर शरीराला एक झटका बसतो. तो धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे पाणी चघळून प्यावे.

२) पाण्याचे तापमान

पाणी पिताना ते अति थंडही असू नये किंवा अति गरमही असू नये. शरीराला पाणी पचवण्यासाठी खरंतर कष्ट लागत नाहीत. पण जर पाण्याचे तापमान चुकले तर मग शरीराला त्रास होतो. त्यामुळे पाणी पिताना त्याचा चटका बसणार नाही आणि ठणकाही बसणार नाही याची काळजी घ्यावी.

३) जेवताना पाणी पिणे

जेवताना पाणी प्यायल्याने भुकेचे गणित चुकते. ठसका लागल्यावर पिणे, काही तिखट लागल्यावर पिणे वेगळी गोष्ट आहे. पण उगाच पाणी पिणे टाळावे. कारण पाण्यामुळे पचनक्रियेचा कालावधी वाढतो आणि पाणी जिरल्यावर पुन्हा भूक लागते.

४) प्लास्टिकचा वापर.

पाणी पिताना ते आपण कशातून पितो हे पाहणेही गरजेचे असते. प्लास्टिकच्या बाटलीतून किंवा ग्लासमधून पाणी पिताना, प्लास्टिकचे काही अंश पोटात जातात. ते शरीरासाठी हानिकारक आहेत. पाणी पिताना धातुंच्या भांड्यांचा वापर करावा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

6 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

6 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

6 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

6 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

12 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

13 तास ago