आरोग्य

डोळ्याचा ताण आणि जळजळ

मसाज: डोळ्या भोवती दिवसातून २-३ वेळेस किमान २९ सेकेंद हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्याने डोळ्यांचे स्नायू रिलॅक्स होण्या सोबतच तेथील रक्तपुरवठा सुधारण्यास मदत होते.

हाताच्या तळव्यांचा स्पर्श: हाताचे दोन्ही तळवे एकमेकांवर घासा. नंतर हळूच त्याचा स्पर्श डोळ्यांवर करावा. २-३ मिनिटा नंतर हात बाजूला करा. असे केल्याने प्रखर प्रकाशामुळे डोळ्याला होणारा त्रास कमी होण्यास मदत होते.

थंड दूध: डोळ्यावरचा ताण हलका करण्यासाठी त्यावर थंड दूधात भिजवलेले कापसाचे बोळे ठेवावेत. ४-५ मिनिटांनी रिलॅक्स वाटेल. जर कामावर असाल तर थंड दुधा ऐवजी थंड पाण्याचा वापर करावा. थंडाव्यामुळे रक्तवाहिन्या मोकळ्या होण्यास मदत होते. तसेच ताणामुळे आलेली सूज कमी होण्यास मदत होते.

काकडी: काकडी मध्ये कुलिंग इफेक्ट असल्याने अनेकदा सलून मध्ये फेसपॅक लावल्या नंतर डोळ्यावर काकडी ठेवली जाते. काकडी मधील अ‍ॅस्ट्रीजंट घटक डोळ्यांवरील ताण हलका करतात. काकडीचे काप ३-४ मिनिटे डोळ्यांवर ठेवा आणि काही वेळ आराम करा.

गुलाबपाणी: थंड प्रवृत्तीचे गुलाबपाणी डोळ्या मधील जळजळ कमी करण्यास मदत करते. त्यातील अ‍ॅस्ट्रिजंट आणि दाहशामक घटक डोळ्यांवरील ताण हलका करण्यास मदत करतात. गुलाबपाण्यात कापसाचा बोळा बुडवून तो डोळ्यांवर ठेवावा. ४-५ मिनिटांनी काढून चेहरा हलकसा पुसावा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

5 तास ago

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

1 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

1 दिवस ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

2 दिवस ago

फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजारच जडला! हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…

2 दिवस ago

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

2 दिवस ago