मसाज: डोळ्या भोवती दिवसातून २-३ वेळेस किमान २९ सेकेंद हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्याने डोळ्यांचे स्नायू रिलॅक्स होण्या सोबतच तेथील रक्तपुरवठा सुधारण्यास मदत होते.
हाताच्या तळव्यांचा स्पर्श: हाताचे दोन्ही तळवे एकमेकांवर घासा. नंतर हळूच त्याचा स्पर्श डोळ्यांवर करावा. २-३ मिनिटा नंतर हात बाजूला करा. असे केल्याने प्रखर प्रकाशामुळे डोळ्याला होणारा त्रास कमी होण्यास मदत होते.
थंड दूध: डोळ्यावरचा ताण हलका करण्यासाठी त्यावर थंड दूधात भिजवलेले कापसाचे बोळे ठेवावेत. ४-५ मिनिटांनी रिलॅक्स वाटेल. जर कामावर असाल तर थंड दुधा ऐवजी थंड पाण्याचा वापर करावा. थंडाव्यामुळे रक्तवाहिन्या मोकळ्या होण्यास मदत होते. तसेच ताणामुळे आलेली सूज कमी होण्यास मदत होते.
काकडी: काकडी मध्ये कुलिंग इफेक्ट असल्याने अनेकदा सलून मध्ये फेसपॅक लावल्या नंतर डोळ्यावर काकडी ठेवली जाते. काकडी मधील अॅस्ट्रीजंट घटक डोळ्यांवरील ताण हलका करतात. काकडीचे काप ३-४ मिनिटे डोळ्यांवर ठेवा आणि काही वेळ आराम करा.
गुलाबपाणी: थंड प्रवृत्तीचे गुलाबपाणी डोळ्या मधील जळजळ कमी करण्यास मदत करते. त्यातील अॅस्ट्रिजंट आणि दाहशामक घटक डोळ्यांवरील ताण हलका करण्यास मदत करतात. गुलाबपाण्यात कापसाचा बोळा बुडवून तो डोळ्यांवर ठेवावा. ४-५ मिनिटांनी काढून चेहरा हलकसा पुसावा.
(सोशल मीडियावरून साभार)