महाराष्ट्र

ऐतिहासिक वास्तूंचे पावित्र्यभंग करणाऱ्यांवर कठोर शिक्षेची तरतूद करावी

नागपूर: राज्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक गडकिल्ल्यांचे व पुरातत्व स्थळांच्या पावित्र्य भंगाच्या घटना समोर येतात . या ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण करण्यासाठी मुबलक प्रमाणात कर्मचारी व पावित्र्यभंग करणाऱ्यांवर कठोर शिक्षेची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुरातत्व शास्त्र विषयक स्थळे व अवशेष (सुधारणा) विधेयकावरील चर्चेदरम्यान सरकारकडे केली.

महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुरातत्व शास्त्र

विषयक स्थळे व अवशेष ( सुधारणा) विधेयक – २०२४ आणून शासनाने अत्यंत स्तुत्य काम केले आहे. सदरील विधेयक अत्यंत चांगले असले तरीही शिवकालीन व यादवकालीन अनेक गड किल्ल्यांवर मद्य सेवन व जुगार खेळले जातात. तरुण पिढीला या गडकिल्ल्यांचे पावित्र्य माहित नसते. त्यामुळे या गडकिल्ल्यांचे पावित्र्य राखले जावे, यासाठी कठोर शिक्षेची तरतूद करणे आवश्यक असल्याचे दानवे म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

10 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

14 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

14 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

14 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

14 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

15 तास ago