आरोग्य

सारखी चक्कर येते, चालताना धाप लागते? असू शकतात ‘या ‘ गंभीर आजाराची लक्षण

आपल्या शरीरात काही बदल झाले की आपल्याला त्याचे पूर्वसंकेत मिळू लागतात. व्हिटॅमिन्स, मिनरल्स, लोह हे आपल्या शरीरातील सगळ्यात महत्त्वाच्या खनिजांपैकी एक आहे. जे रक्तातील हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत करते. शरीरात लोहाची कमतरता जाणवू लागली की, आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो, त्वचेच्या रंगात बदल होण्यापासून ते मानसिक आरोग्यावरही त्याचा परिणाम पाहायला मिळतो. लोहाच्या कमतरतेमुळे शरीर आतून पोकळ होते. उठण्या-बसण्याचा देखील त्राण आपल्यात राहात नाही. आपल्या साध्या वाटणाऱ्या गोष्टींकडे आपण सहज दुर्लक्ष करतो. यामुळे आपल्याला सतत थकल्यासारखे वाटणे किंवा चक्कर येणे. श्वास घेण्यास अडचणी, त्वचेचा रंग बदलणे यांसारखी लक्षणे आपल्याला पाहायला मिळतात. हा फक्त ताण नसून लोहाच्या कमतरेती लक्षणे आहेत.

1) सतत थकवा येणे

जर आपल्याला सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवत असेल. थोडे काम केल्यानंतर शरीरातील ऊर्जा कमी होत असेल तर ते लोहाच्या कमरतेमुळे असू शकते. लोहाची कमतरता झाल्यामुळे शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवता येत नाही, ज्यामुळे लवकर थकवा येतो.

2) ओठांचा रंग बदलतो

रक्ताच्या कमरतेमुळे शरीराच्या अनेक भागात बदल होतात. त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो. आपली त्वचा, ओठ किंवा डोळ्यांखालील भाग पिवळा किंवा पांढरा पडू लागतो. तसेच यामुळे चेहऱ्यावर असलेली चमक देखील कमी होते.

3) चक्कर येणे

शरीराला योग्य प्रमाणात लोह किंवा रक्तपुरवठा मिळाला नाही तर चक्कर येते. यामध्ये मेंदूपर्यंत पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पोहोचत नाही. सतत डोके दुखणे, चक्कर येणे किंवा डोके जड होणे यांसारख्या समस्या येतात.

4) श्वास घेण्यास अडचण

शारीरिक क्रियाकल्प वाढल्यास आपल्याला त्रास होऊ लागतो, हे देखील शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे होते. अचानक हृदय जोरात धडधडणे, चालतना किंवा पायऱ्या चढताना त्रास होणे. शरीराला पुरेशा ऑक्सिजन मिळाला नाही की, असे होते.

5) केसगळती 

लोहाच्या कमरतेचा आपल्या केसांवर आणि नखांवर देखील परिणाम होतो. ज्यामुळे केसगळती, नखांवर पांढरे किंवा पिवळे डाग येणे. नख सतत तुटणे किंवा नखे पातळ होणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

 

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवसा घरफोडीचा थरार! शेतात गेलेल्या कुटुंबाचा फायदा घेत १७ तोळे सोन्यावर डल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…

13 तास ago

भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…

13 तास ago

शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…

13 तास ago

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

1 दिवस ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

1 दिवस ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड; पाहा Video

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

1 दिवस ago