आरोग्य

नुसते तूप खाऊन रुपच येतंच पण शरीराच्या ‘या’ भागावर लावल्यास मिळतात अनेक फायदे

तूप खाल्ल की, रुप येतं अशी म्हण आपण ऐकली असेलच. तूप हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. तुपाचा वापर हा आपल्या आहारात अगदी पूर्वीपासूनच करण्यात आला आहे. गरम गरम वरण- भातासोबत तुपाची धार आजही याची चव अनेक जण चाखतात. आहारात तुपाचे प्रमाण योग्य असेल तर आपली अनेक आजारांपासून सुटका होते. तूप कोणत्याही पदार्थाची चव वाढवते.

तुप फक्त खाल्लेच नाही तर ते चेहऱ्यावर देखील लावले जाते. चेहऱ्यावर तूप लावल्याने त्वचा ग्लो होण्यास मदत होते तसेच त्वचेचा पोत देखील सुधारतो. तुपामध्ये व्हिटॅमिन ए, डी, आणि ई असते. तसेच हेल्दी फॅट, कॅल्शियम आणि ओमेगा-३ सारखे गुणधर्म यात असतात. आपल्यापैकी अनेकांना तुप खाण्याची आणि चेहऱ्याला लावण्याची योग्य पद्धत माहिती आहे. परंतु, शरीराचे काही भाग असे आहेत जिथे तूप लावल्याने असंख्य आजार दूर होतात.

1) डोळ्यांमध्ये काजळसारखे तूप लावल्याने आपल्या डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहाते. यामुळे सतत वापरल्या जाणाऱ्या स्क्रिनमुळे डोळ्यांवरील ताण हलका होतो. जर आपले डोळे सतत कोरडे होत असतील तर तुपाचा वापर करायला हवा. तसेच जर आपल्या डोळ्यांना सतत अंधारी येत असेल तर त्यांना टवटवीत करण्याचे काम देखील तूप करते.

2) नाक हा आपल्या शरीरात महत्त्वाचा अवयव. यातून आपल्या श्वासोच्छवासाची प्रक्रिया होते. नाकात तूप घातल्याने ऍलर्जी कमी होण्यास मदत होते. नाकात श्लेष्मा जमा झाला असेल तर त्वचा ओलसर करण्यासाठी आणि घाण बाहेर करण्यासाठी याचा वापर होतो. सतत चिडचिड होत असेल आणि मानसिक शांतता हवी असेल तर तूप यावर बहुगुणी ठरते.

3) शरीराचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपली नाभी. नाभीमध्ये तूप घातल्याने पाचनाचे आरोग्य चांगले राहाते. पुनरुत्पादक आरोग्यदेखील सुधारते. त्वचा आणि केसांना योग्य प्रमाणात पोषण मिळते. जर आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर तूप नाभीत टाकल्याने फायदा होतो.

4) अनेकदा खूप चालल्यानंतर आपल्या तळपायावर त्याचा अधिक भार येतो. ज्यामुळे त्याची आग होते. तळपायावर तूप घासल्याने डोके शांत होण्यास मदत होते. पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था सक्रिय करते. तुपामुळे आपल्या शरीरातील सर्व अवयवांना ऊर्जा मिळते.

 

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

3 तास ago