मेष: आपला आजचा दिवस फार आव्हानात्मक असेल त्यामुळे सतर्क राहून काम करा. तुमच्या समोर बऱ्याच जबाबदाऱ्या असतील आणि फार मेहनत घेवून काम करावे लागेल.ऑफिसमध्ये काम वाढत असून तुमच्यावर कामाची जास्त जबाबदारी असेल. दरम्यान सहकाऱ्यांची मदत मिळणार नाही. पण तुम्ही काळजी करू नका सगळ्या जबाबदाऱ्यांवर तुम्ही खरे उतरणार आहात. तसेच प्रत्येक कामात यश असून आजचा दिवस उत्तम असेल.
वृषभ: आज शुभलाभाचा दिवस आहे. तुम्ही जे काम हाती घेणार त्यात यश असेल. प्रतिस्पर्धी तुमच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतील पण ते फार काही करू शकणार नाहीत. हळूहळू यश, सुखसमृद्धीचे योग बनत असून धनवृद्धी होईल. कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी मात्र आजचा दिवस अनुकूल नाही. दिवसाचे काम लवकर संपवून सायंकाळचा वेळ कुटुंबाला द्यावा, तसेच बाहेर फिरायला जावे.
मिथुन: आजचा दिवस सामान्य आहे. प्रत्येक कार्यात नशिबाची साथ असेल. ग्रहांचे शुभयोग तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळवून देतील. मूलांसंदर्भात एखादी चांगली बातमी मिळेल त्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. आनंददायक बातमी मिळाल्याने मनोबल वाढेल. नोकरी असो वा व्यवसाय तुम्ही जे काम करणार आहात त्यात सतर्क राहून प्रयत्न करावेत, तर तुम्हाला यश मिळेल.
कर्क: आजचा दिवस शुभ असून एखाद्या शुभकार्यात तुम्ही जास्त रुची घेणार आहात. ऑफिसमध्ये एखादी व्यक्ती तुमच्यासाठी समस्या उभ्या करेल. सावध राहा आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. तुम्ही विरोधकांना चांगला धडा शिकवणार आहात. तुम्ही घेतलेले निर्णय भविष्यात फायदा देतील. तुमचा जनसंपर्क वाढल्यामुळे आनंद द्विगुणीत होईल..
सिंह: आज नशिबाची साथ असेल. विरोधकांचे षडयंत्र अयशस्वी होणार तसेच प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल. कौटुंबिक सुख देणाऱ्या सोयी सुविधा वाढणार आहेत. दरम्यान काही कारणामुळे खर्च वाढेल. शुभ कार्यात खर्च झाल्याने मानसिक समाधान मिळेल. बऱ्याच दिवसांपासून काही लोकांसोबत असणारी कटुता समाप्त होईल. नवीन ओळखीचे रुपांतर मैत्रीत होणार असून भविष्यात या गोष्टी लाभ देतील.
कन्या: आज धनवृद्धीचे योग असून कामात नशिबाची साथ मिळेल. तुमच्या व्यापाराशी संबंधित योजना यशस्वी होणार आहेत. प्रवासाचा योग असून त्यात लाभ होईल. स्पर्धकांसाठी तुम्ही डोकेदुखी ठरणार असून विरोधकांवर मात कराल. वैवाहिक जीवनात सुखद स्थिती असून कुटुंबासोबत एखाद्या शुभकार्यात सहभागी होणार आहात. आपल्या लोकांसोबत जास्त काळ राहिल्यामुळे मानसिक समाधान मिळेल.
तूळ: आज शुभलाभाचा योग आहे. नोकरी – व्यवसायात जास्त कष्ट आहेत तसेच उत्पन्न कमी आणि खर्च अधिक होईल. तुमचे गुप्त शत्रू सक्रिय होणार आहेत. दुपारनंतर जास्त धावपळ असेल त्यामुळे ताण वाढेल. तब्येतीची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कौटुंबिक अशांतीमुळे ऑफिसमधील कामही प्रभावित होऊ शकते.
वृश्चिक: आज करिअरमध्ये आव्हानात्मक परिस्थिती असेल. तुम्हाला खूप धावपळ करावी लागेल तरच काम पूर्ण होईल. काही महत्त्वाचे व्यावसायिक कॉन्ट्रॅक तुमच्या बाजून होणार आहेत. तुमचे विचार दुसऱ्यापर्यंत नेण्यात यशस्वी झाला तर उत्तम यशाचे योग आहेत. ऑफिसमध्ये वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील तसेच तुम्हाला उत्तम मार्गदर्शन मिळेल..
धनु: आजचा दिवस उत्तम आहे तसेच मानसन्मानात वाढ होईल. प्रत्येक कामात नशिबाची साथ असून यश मिळेल. मित्रांकडून धनलाभ होईल. तुमच्या काही इच्छा पूर्ण होणार आहेत. व्यवसायात तुम्ही घेतलेले निर्णय आणि योजना मार्गी लागलीत. मंगलकार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल, आणि तुमचे मन प्रसन्न राहील.
मकर: आज मानसन्मान वाढणार आहे. व्यापाराशी संबंधित योजना पूर्ण होतील. तुम्हाला प्रतिष्ठित लोकांची साथ मिळेल, आणि तुम्हाला भविष्यात याचा मोठा लाभ होईल. वरिष्ठांच्या कृपेने जमीन, संपत्ती संबंधित वादावर तोडगा सापडेल. सायंकाळी प्रकृती बिघडू शकते, त्यामुळे सावध राहावे.
कुंभ: आज लाभाचा दिवस असून सुखसमृद्धीचे योग आहेत. सहज मार्गाने पैसे मिळण्याचे काम मिळाल्याने मन आनंदी असेल. नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेला वाद संपणार आहे. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. कोणी उधारी मागितली तर देवू नका.
मीन: आज शुभलाभाचा दिवस आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होणार आहेत,अनेक संधी समोर दिसतील त्याचा लाभ घ्या. तुमच्या कामाचा वेग बघून विरोधक काहीच करू शकणार नाहीत. व्यवसायात अधिक गुंतवणूक करणे लाभदायक राहील. कामगार वर्गाचे प्रश्न मार्गी लावा. धनवृद्धीचे योग प्रबळ आहेत.
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…