शिरूर तालुका

अष्टविनायक महामार्गावरील कवठे येमाई येथे उघड्या चेंबरमुळे अपघातांची मालिका

सार्वजनिक बांधकाम विभागाला अद्याप जाग येईना

शिरूर (अरुणकुमार मोटे): अष्टविनायक महामार्गावरील कवठे येमाई येथील उघड्या चेंबरमुळे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. गेल्या सात दिवसांत येमाई मंदिर चौकाजवळ रामदेव बाबा स्टील दुकानाच्या समोरील याच उघड्या चेंबरमुळे दोन अपघात घडले आहेत. वारंवार ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवूनही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

शनिवारी (दि. १३) निलेश मिंडे हे दुचाकीवरून आपल्या संविदणे गावी निघाले असताना, रस्त्यावरील हा उघडा चेंबर त्यांना दिसला नाही. ते थेट दुचाकीसह चेंबरमध्ये पडले. या अपघातात त्यांना दुखापत झाली असून त्यांच्या वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच टाकळी हाजी गावचे सरपंच दामूअण्णा घोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींची विचारपूस केली.

कवठे येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब डांगे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, “कवठे येथे अष्टविनायक महामार्गावर चार चेंबर उघड्या अवस्थेत असून त्यांची झाकणे तुटलेली आहेत. यामुळे वारंवार अपघात होत आहेत.”

डांगे यांनी महामार्गाचे ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना तातडीने हे उघडे चेंबर दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. जर यावर त्वरित उपाययोजना न झाल्यास तीव्र जनआंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. महामार्ग प्रशासनाच्या व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे रस्त्यावरील हे उघडे चेंबर प्रवाशांसाठी ‘मृत्यूचे सापळे’ ठरत आहेत. प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

8 तास ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

14 तास ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

16 तास ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

16 तास ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

17 तास ago

व्होट चोर ज्ञानेश कुमारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…

1 दिवस ago