आरोग्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपल्या राशीनुसार आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस शुभ आहे. आर्थिक स्थिती चांगली असून प्रत्येक कामात तुम्हाला नशीबाची साथ मिळेल. प्रवासाचे योग आहेत त्यात लाभ मिळेल. दुपारनंतर एखाद्या ज्येष्ठ व्यक्तींसोबत वाद होऊ शकतो. कायदेशीर बाबतीत नवीन वळण येणार आहे, तेव्हा सतर्क राहा. संध्याकाळपर्यंत तुमच्या योजना पूर्ण होतील. पाहुण्यांच्या आगमनामुळे खर्च वाढण्याची शक्यता आहे.

वृषभ: तुम्ही कोणालाही अपशब्द बोलू नका. तुमच्या कामामुळे आणि त्यातील उत्साह, जोश यामुळे तुम्ही विरोधांवर मात करणार आहात. घरगुती वापरासाठी वस्तूंची खरेदी होणार आहे, तेव्हा खर्च वाढेल. धार्मिक कार्यात खर्च केल्यामुळे तुमचा मान-सन्मान वाढणार आहे. रखडलेली कामे पूर्ण झाल्यामुळे तुमचं मन आनंदित होईल.

मिथुन: आजचा दिवस फारसा चांगला नाही, तुमचे कोणत्याही कामात मन लागणार नाही आणि तुमच्या योजना अर्धवट राहतील. मिथुन राशीचे जे लोक राजकारणाशी संबंधित आहे त्यांना समस्या येणार आहेत. राजकीय कामात अडथळे आल्यामुळे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. कामामध्ये योग्य आणि काहीतरी नवीन रणनीती तयार करा तरच कामे मार्गी लागतील. आर्थिक स्थिती फारशी चांगली राहणार नाही. रात्री तुम्ही कुटुंबासोबत मंगलकार्यात सहभागी होणार आहात.

कर्क: आजचा दिवस चांगला असून तुम्हाला प्रत्येक कामात तुम्हाला यश आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगली वेळ आहे कामात फोकस असेल तसेच, तुम्ही जे काही करायते ठरवले ते यशस्वीरित्या पूर्ण होणार. चांगल्या कार्यात तुमची रुची कायम राहील. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी प्रगतीचे योग आहेत. नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे. मानसिक समाधान मिळेल पण अती कामामुळे थकवा जाणवेल तेव्हा तब्येत सांभाळा.

सिंह: आजचा दिवस चांगला असून, समाजात तुमची चांगली प्रतिमा निर्माण होईल. धनलाभाचे योग आहेत. सध्या ज्या योजनांवर काम करत आहात, त्यात सावधगिरी बाळगा. प्रमोशनची संधी आहे. व्यवसायात उत्तम नफा होईल. तुमचे रखडलले पेमेंट मिळल्यामुळे थांबलेली कामे पूर्ण होतील. काही लोक तुमच्या कामाला विरोध करतील तरीसुद्धा तुमची कामे पूर्ण होणार आहेत.

कन्या: तुमची जबाबदारी तुम्ही व्यवस्थित पूर्ण करणार आहात. व्यवसायात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुमची जबाबदारी वाढल्यामुळे काही अडचणींची परिस्थिती निर्माण होऊ शकते, पण घाबरू नका आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. संध्याकाळपासून रात्रीपर्यंत जुन्या मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न राहील. संध्याकाळचा वेळ आनंदात जाईल.

तुळ: जीवनसाथीचं सहकार्य आणि साथ मिळेल, आणि त्यांच्या मदतीने तुम्ही कोणतंही नवीन काम सुरू करू शकता. व्यावसायिक प्रयत्न यशस्वी होतील. तुमची एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरी होण्याची शक्यता आहे, सावध राहा. आज जे काही काम कराल ते मन लावून करा.

वृश्चिक: आज प्रत्येक कामात लाभ आणि फायदा आहे. ऑफिसमध्ये तुमचे अधिकार वाढल्यामुळे सहकारी तुमच्याशी तुटक वागतील. तुमच्या प्रमोशनमुळे सहकाऱ्यांचा मूड काहीसा बिघडू शकतो. तुमचा वेळ दुसऱ्यांची कामे करण्यात जाणार आहे. दुसऱ्यांना मदत केल्याने मानसिक समाधान मिळेल. संध्याकाळचा वेळ कुटुंबातील सदस्यांसोबत सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.

धनु: तुमच्या आजूबाजूचे वातावरण काहीसे प्रतिकूल राहील. मात्र, तुम्ही संयमाने आणि गोड वाणीने सगळं काही सांभाळून घ्याल. आर्थिक स्थिती ठिक आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीची मदत केल्यामुळे तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. रात्रीचा वेळ आनंदात जाईल आणि तुमचं मन खूप प्रसन्न असेल.

मकर: आजचा दिवस फायदेशीर असून एखाद्या नवीन डीलमुळे अचानक आर्थिक लाभ होतील. घरात पत्नी किंवा मुलांची अचानक तब्येत बिघडल्यामुळे तुम्हाला तणाव येऊ शकतो. कोणतंही महत्त्वाचं काम करताना किंवा गाडी चालवताना सावध राहा, तुमच्या टेन्शनचा कामावर परिणाम होणार नाही याकडे लक्ष द्या.मैत्रीत आंधळेपणाने कोणावरही विश्वास ठेवू नका, नाहीतर तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. जोखमीच्या कामापासून दूर राहा

कुंभ: उत्तम यश मिळणार असून चांगला धनलाभ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीचा विचार करु शकता. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही टेन्शनमध्ये होता ते काम पूर्ण होईल. वादविवाद झाले तर शांतपणे संवादाने त्यावर तोडगा काढा. रात्रीचा वेळ कुटुंबासोबत आनंदाने जाणार आहे.

मीन: आजचा दिवस आनंदाने भरलेला असून नशिबाची उत्तम साथ मिळेल. ज्यांनी करिअरची नुकतीच सुरूवात केली आहे, ती मंडळी ऑफिसमध्ये स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करतील. तुमच्या कामामुळे ऑफिसमध्ये तुमचं कौतुक होणार आहे. आर्थिक स्थिती चांगली राहणार असून कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा योग आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

9 तास ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

9 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

13 तास ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

13 तास ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

13 तास ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

14 तास ago