आरोग्य

पोटॅशियम ची कमतरता

शरीराला ताकद पुरविणारे ‘पावर हाउस’ कोणते असा प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर पोटॅशियम असेच असेल. पोटॅशियम शरीरातील कोशिका मध्ये असून, हे नर्व्हज आणि स्नायूंना क्रियाशील ठेवण्यास मदत करते. तसेच इतर पौष्टिक तत्वे अवशोषित होण्यासाठी, किडनीचे कार्य सुरळीत चालण्यासाठी आणि सोडियमची पातळी नियंत्रित ठेवण्यासही पोटॅशियम सहायक आहे.

आहारात ताज्या भाज्या आणि फळांचा समावेश करून आपण पोटॅशियम प्राप्त करू शकतो. पण वास्तविक बहुतेक व्यक्तींच्या बाबतीत दैनंदिन शारीरिक गरजेच्या अर्ध्या मात्रे मध्येच पोटॅशियम मिळत असते. जर शरीराला पोटॅशियम कमी मात्रे मध्ये मिळत असले, तर त्यामुळे बद्धकोष्ठ, स्नायू मध्ये अशक्तपणा, शारीरिक थकवा अशी लक्षणे जाणवू लागतात.

जसजशी पोटॅशियमची कमतरता वाढू लागेल, तसतशी ही लक्षणे देखील जास्त जाणवू लागतात. जर ही लक्षणे प्रमाणा बाहेर वाढली, तर त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार उद्भवू शकतात. ज्या व्यक्ती लॅक्झेटीव्हज किंवा डाययुरेटिक औषधांचा अतिवापर करतात, त्यांच्या शरीरात पोटॅशियमची कमतरता होऊ शकते. तसेच ज्यांचा मधुमेह नियंत्रणात नसेल, किंवा ज्यांना वारंवार डायरियाचा त्रास होत असेल, त्यांच्याही शरीरा मध्ये ही कमतरता उद्भवते. त्याच बरोबर अतिशय उष्ण हवामानात सतत शारीरिक श्रम केल्यानेही ही कमतरता उद्भवते.

पोटॅशियमच्या कमतरतेची लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हृदयाचे ठोके अनियमित असणे, रक्तदाब प्रमाणाबाहेर वाढणे, किडनी स्टोन्सचा त्रास उद्भवणे, सतत शारीरिक थकवा जाणवणे, कोणत्याही प्रकारचे शारीरिक श्रम करीत असताना स्नायू मध्ये ‘क्रॅम्पस्’ येणे, ही सर्व लक्षणे देखील पोटॅशियमच्या कमतरतेची सूचक असू शकतात. ही कमतरता आहारात ताज्या भाज्या, फळांचा समावेश करून दूर करता येतेच, पण गरज वाटल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लीमेंटस् घेऊन पोटॅशियमची कमतरता दूर करता येते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुणे-नगर महामार्गावर मध्यरात्री एसटी बस अडवून दहशत; काळ्या स्कॉर्पिओतून आलेल्या चौघांचा मध्यरात्री धुडगूस

शिरुर (तेजस फडके) पुणे-अहिल्यानगर महामार्गावर न्हावरे फाटा येथे मध्यरात्री धावणाऱ्या एसटी बसला एका काळ्या रंगाच्या,…

26 मिनिटे ago

ठाकरे गटात मोठी फूट पडणार? नरेश म्हस्केंचा मोठा दावा; म्हणाले…

मुंबई: राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठाकरे गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.…

1 तास ago

ओबीसी आरक्षणासाठी भुजबळांनी रस्त्यावर उतरावे; अन्यथा पापाचे वाटेकरी ठराल : विजय वडेट्टीवार

नागपूर: राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक…

1 तास ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ४ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती; एकनाथ शिंदेंचे निर्देश

मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…

2 तास ago

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

20 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

24 तास ago