आरोग्य

दारू हळद म्हणजे काय

काही औषधी वनस्पती या इतक्या अनोख्या आहेत की, त्यांच्या उपचारांचा इतिहास सुद्धा प्राचीन आहे. आणि फार कोणाला त्याबद्दल ठावूकही नाही. वनस्पती आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात, त्यातील एक महत्त्वाची औषधी वनस्पती आहे दारू हळद किंवा दारूहरिद्रा होय.

दारू हळद म्हणजे काय? 

हे खाणाऱ्याला आयुष्यात कधीच होत नाही डायबिटीज, रक्तातील साखर आपोआप होते गुल

त्वचेसंबंधी समस्या कमी करण्यासाठी.

दारू हळदीमध्ये शक्तिशाली अँटी- इंफ्लेमेटरी आणि अँटी- बॅक्टेरियल गुण आहेत, ज्यामुळे ते त्वचेवरील समस्या जसे की मुरूम, सोरायसिस, आणि इन्फ्लेमेशन कमी करण्यात मदत करते. त्याचे अँटी- बॅक्टेरियल गुण मुरुमांमुळे होणाऱ्या बॅक्टेरियाच्या वाढीला प्रतिबंध करतात. यामुळे त्वचा स्वच्छ, तेजस्वी आणि निरोगी बनते.

दारू हळदीचे फळ व्हिटॅमिन सी चा समृद्ध स्रोत आहे. दारुहरिद्रा मुख्यत्वे जळजळ आणि सोरायसिस यासारख्या त्वचेच्या समस्यांसाठी फायदेशीर आहे. हे मुरुमांना कारणीभूत असलेल्या बॅक्टेरियाच्या वाढीस रोखून आणि त्याच्या अँटी-बॅक्टेरियल आहे.

दारू हळदीचे लिव्हरसाठी विशेष फायदे आहेत. हे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानीपासून लिव्हरच्या पेशींचेही संरक्षण करते कारण त्यात अँटिऑक्सिडंट, अँटी- इंफ्लेमेटरी आणि हेपेप्रोटेक्टिव्ह गुणधर्म असतात. हे गुण लिव्हरची सुरक्षा करतात. हे यकृताच्या पेशींचे संरक्षण करून फ्री रेडीकल्सचा हल्ला रोखतात तसेच यकृताचे कार्य सुधारते.

मलेरिया आणि जुलाबावर नियंत्रण…

दारू हळदी त्याच्या अँटी- मलेरिया गुणांमुळे मलेरिया विषाणूंच्या वाढीला थांबवू शकते. मलेरिया बरा करण्यासाठीही याचा उपयोग होतो. कारण ते मलेरियाच्या बॅक्टेरियांना शरीरात वाढूच देत नाही यामुळे मलेरिया नियंत्रणात ठेवण्यात मदत मिळते. तसेच, त्याच्या अँटीमायक्रोबियल गुणधर्मामुळे अतिसाराच्या जंतूंच्या वाढीवर देखील नियंत्रण ठेवता येते.

ब्लड शुगर नियंत्रण…

दारू हळदी रक्तातील साखरेच्या पातळीस नियंत्रित करण्यासाठी देखील प्रभावी आहे. यामध्ये असलेल्या सक्रिय घटक ‘बर्बेरिन’ मुळे ग्लीकोज मेटाबॉलिझम सुधारतो, ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित राहते. यामुळे डायबिटीससारख्या आजारावर नियंत्रण ठेवणे सहज होऊ शकते.

वजन कमी करण्यास मदत…

दारू हळदीचे वजन कमी करण्यास देखील महत्त्व आहे. त्याचे अँटीऑक्सीडेंट गुण शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल आणि फॅट सेल्स कमी करून वजन कमी करण्यात मदत करतात. हे शरीराला निरोगी ठेवत वजन घटवण्यासाठी मदत करते.

पचनक्रिया व सूज…

दारू हळदीची पावडर पचनक्रिया, सूज आणि अपचन यासाठी मदत करू शकते आणि यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात. शिवाय याच्या सेवनाने शरीरातील सूज कमी होते आणि सांधे, हाडे व शरीरातील वेदना गायब होतात.

दारू हळदीचा वापर कसा करावा..

दारू हळदीचे विविध प्रकारांमध्ये सेवन केले जाऊ शकते.

दारू हळदीचे चूर्ण…

दारू हळदीचे चूर्ण मध किंवा दूध सोबत घेतल्यास हे पचनासंबंधी आजार, अतिसार आणि मासिक पाळीच्या रक्तस्रावावर नियंत्रण ठेवू शकते.

दारू हळदीचे कॅप्सूल…

बाजारात उपलब्ध दारू हळदीच्या गोळ्या किंवा कॅप्सूल देखील घेतले जाऊ शकतात.

आयुर्वेदिक दृष्टीने दारू हळदीचे महत्त्व…

दारू हळदी आयुर्वेदिक उपचार पद्धतीत एक महत्त्वपूर्ण स्थान राखून आहे. त्याचे उपयोग रक्तदोष, पचन संबंधी तक्रारी, त्वचा, हाडांच्या विकार आणि यकृताशी संबंधित समस्यांसाठी केला जातो. यामुळे आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवता येते आणि अनेक जटिल आजारांवर नियंत्रण मिळवता येते.

दारू हळदी आपल्या आरोग्यासाठी एक अत्यंत फायदेशीर औषध आहे. याचे नियमित सेवन आपल्या शरीरातील विविध समस्या दूर करू शकते. त्याच्या अँटी- इंफ्लेमेटरी, अँटी- बॅक्टेरियल, अँटीऑक्सीडेंट आणि हॅपटोप्रोटेक्टिव्ह गुणामुळे शरीर निरोगी आणि शक्तिशाली बनते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

21 तास ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

21 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

1 दिवस ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

1 दिवस ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

1 दिवस ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

1 दिवस ago