आरोग्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस संमिश्र असेल. तुमचे काही काम सामान्यपणे पूर्ण होईल पण काही काम मात्र परीक्षेचा काळ आहे असे वाटेल. आज कामावर अधिक लक्ष केंद्रित करणे चांगले राहील. काही कारणास्तव स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागेल. अती राग किंवा अपशब्द बोलणे कटाक्षाने टाळा. लहानसहान तणाव नोकरी आणि व्यवसायात त्रास देतील पण काळजी करु नका सगळं काही ठिक होणार आहे. संध्याकाळी घरी जास्त वेळ घालवल्याने कुटुंबातील सदस्यांना आनंद होईल.

वृषभ: तुम्ही कामात खपूच व्यस्त असाल पण या सगळ्यात तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होणार नाही हे पाहा. मेहनतीचे फळ मिळेल आणि संध्याकाळी चांगली बातमी मिळेल. नोकरीत तुमचा प्रोजेक्ट अव्वल सिद्ध होणार आहे. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. व्यवसायात मात्र सावध राहा, खास करून तुमचा व्यवसाय जर भागिदारीत असेल तर आर्थिक व्यवहार तपासा. कामगार वर्गामध्ये नाराजी असेल तर दूर करा. गुंतवणुकीच्या बाबतीत तुम्हाला लाभ होईल. त्याचा फायदा घेऊ शकता, जो फायदा झाला आहे तो व्यवसायात गुंतवा. नोकरीत नवीन संधी येण्याची शक्यता आहे.

मिथुन: आजचा दिवस उत्सुकतेने भरलेला आहे. तुम्हाला कुठूनतरी लाभ होण्याची अपेक्षा आहे. जे काम हाती घ्याल त्यात यश मिळेल. नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला आहे. विद्यार्थ्यांचा वेळ अभ्यासात जाणार आहे. जर स्पर्धा परीक्षा देत असाल तर त्यात फायदा होईल. व्यवसायात नवीन तंत्रज्ञान उपयोग केला तर खूप फायदा होईल, तुम्ही व्यवसायानिमित्त परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर संधी मिळण्याचे योग आहेत.

कर्क: आजचा दिवस करिअरच्या बाबतीत खास आहे तसेच धनलाभाचे योग आहेत. हुशारीने तुम्ही समस्येचे निराकरण करणार आहात. व्यवसायात तुमच्या रणनीतीने लाभाचे योग आहेत. आज कोणतीही जोखीम घेण्याचा विचार करु नका. कुटुंबातील तुमचे विरोधक सध्या काही काळ डोके वर काढू शकणार नाहीत. तुम्हाला प्रत्येक बाबतीत लोकांचे सहकार्य मिळेल. जे फ्रिलान्स काम करत आहेत त्यांच्यासाठी चांगला योग आहे..

सिंह: करिअरच्या बाबतीत आजचा दिवस खूप चांगला असेल. मनात कोणतीही गोष्ट किंवा नवीन कल्पना येत असेल तर ती लिहून ठेवा आणि त्यावर सखोल अभ्यास सुरु करा, नक्कीच फायदा होईल. नातेवाईकांशी जुने मतभेद दूर करण्याची वेळ आली आहे. तुम्हाला त्यांची मदत करावी लागू शकते किंवा तुम्हाला त्यांच्याकडून मदत घ्यावी लागू शकते. मित्रांसोबत राहण्याचा फायदा होईल, काही अडचणीत मित्रांची साथ मोलाची असेल. कुटुंबातील सदस्या सोबत वाद घालू नका.

कन्या: आजचा दिवस खूप व्यस्त असणार आहे. विचारपूर्वक आणि डोक्याने केलेल्या कामाचा फायदा होईल. खूप दिवसांपासून तुम्ही ताणतणाव सहन करत होतात पण आता तो कमी होईल. व्यवसायात नफा होण्याचे योग आहेत. तुम्ही इतरांना मदत कराल तसेच तुम्हाला मदत करणारेही पुढे येतील. प्रामाणिकपणे जे काम कराल ते फलदायी असेल. तुम्ही काही नवीन शिकण्याचा विचार करत असाल तर त्यात त्वरित निर्णय घ्या, तुमच्यासाठी उच्च शिक्षण फलदायी आहे.

तुळ: आजचा दिवस शुभ लाभाने भरलेला आहे. फोनवरून काही चांगली बातमी मिळेल. ऑफिसमधील सहकारी कामात मदत करतील त्यामुळे प्रोजेक्ट वेगाने पुढे सरकणार आहे. व्यवहार आणि व्यवसायात धोका आहे तेव्हा सावध राहा. तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे. काही त्रास वाटत असेल तर त्वरित तपासणी करा. लवलाइफचा विचार केला तर खर्च थोडा वाढणार आहे. जोडीदारासाठी खरेदी करावी लागेल. तुमचे काम वेळेवर पूर्ण व्हावे असे वाटत असेल तर कठोर मेहनत गरजेची आहे.

वृश्चिक: दुपारपर्यंत खूप काम असेल. फोन, ईमेलला उत्तरे देणे किंवा मिटींगमध्ये तुम्ही व्यस्त असाल. व्यवसायात नफ्याची शक्यता आहे. एखादी नवीन डिल होवू शकते त्यासाठी दस्तऐवज तयार ठेवा. प्रवासाचा योग आहे एखादी बिझनेस ट्रीप प्लॅन होवू शकते. तुमच्या आगामी प्रोजेक्टचे पेपर तयार ठेवा. संध्याकाळी पार्टीला जाणार आहात. तिथे काही प्रतिभावंत लोकांसोबत तुमची भेट होईल त्यामुळे तुमची काही कामे मार्गी लागतील.

धनु: करिअरच्या बाबतीत प्रगती असून व्यवसायात तुमच्या सर्व योजना यशस्वी होतील. सध्या तुमची वेळ अतिशय चांगली आहे त्याचा फायदा घ्या. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी वाद घालू नका. तुमच्या अनेक इच्छा आज पूर्ण होतील. तुमचा जनसंपर्क दांडगा आहे त्यामुळे एखादे महत्त्वाचे काम होऊ शकते. नोकरी किंवा व्यवसायात तुम्ही महत्त्वाच्या प्रोेजेक्टवर काम करत आहात त्यात यश मिळेल फक्त वेळे नुसार नियोजन करा. आर्थिक कामात अनुभवी लोकांच्या सल्ला घ्या, लाभ होईल

मकर: प्रत्येक काम खूप सावधगिरीने करायला हवे. तुमचे कोणासोबत वाद होणार नाहीत असे पाहा. कामाच्या ठिकाणी तुमच्या परिस्थिती सुधारते आहे. तुमच्या शब्दाला लोकं मानत आहेत. व्यवसायात नफ्याची शक्यता आहे. तुम्हाला व्यवसायात काही बदल करायचे आहेत ते नक्की करा. वैवाहिक जीवनात वेळ सुखाची आहे. दिवसभर तुम्ही जी काही कामे आखली होती ती पूर्ण करणार आहात. एकूणच दिवस चांगला आहे फक्त वादविवादापासून दूर राहा.

कुंभ: तुमच्या उत्तम नेतृत्वामुळे सगळी टीम तुमच्यासाठी हजर असेल, तुम्हाला कामात मदत मिळेल. जे काही आज ठरवणार ते तुम्ही उत्तम प्रकारे मार्गी लावणार आहात. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत मिळून काम केल्याने चांगले परिणाम मिळतील. व्यवसायात फायदा आहे फक्त आर्थिक काम करताना सतर्क राहा. मित्रांसोबत भेटी होणार असून मित्रांसाठी गिफ्ट खरेदी करणार आहात. दरम्यान खरेदी करताना खिशावर फार ताण येणार नाही याकडे पाहा. तुमच्या योजना यशस्वी होतील आणि मान सन्मान वाढेल.

मीन: आजचा दिवस सामान्य असेल. हळू हळू पुढे जाण्यातच फायदा आहे. तुम्ही धावधाव करु नका कारण अती घाई तुम्हाला संकटात नेवू शकते. प्रयत्न करत राहिल्यास अडकलेली कामे पूर्ण होतील. आजचा दिवस संघर्षाचा शेवटचा टप्पा असेल. त्यामुळे थांबू नका आणि अजिबात घाबरू नका. जे काही होते ते चांगल्यासाठी असा विचार करा. अनावश्यक खर्च होतो आहे तो कमी करा. तुम्ही कामात खूप व्यस्त असता दरम्यान कुटुंबाला वेळ द्या त्यामुळे मानसिक समाधान वाढेल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गांधी भवनवरील हल्ल्यामागे भाजप-पोलिसांची फूस; काँग्रेस गांधींचा मार्ग सोडणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…

7 तास ago

लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…

8 तास ago

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

12 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

12 तास ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

12 तास ago

यशवंतरावांच्या जिल्ह्यात ठरावांचा लिलाव दुर्दैवी! ठरावांचा बाजार म्हणजे लोकशाहीचा पराभव

सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…

12 तास ago