शिरूर (अरुणकुमार मोटे): रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने वटपौर्णिमा ,रामलिंग येथे दरवर्षी प्रमाणे वडाचे झाड लावून साजरी करण्यात आली.
वटपौर्णिमा हा सण सर्व ठिकाणी आनंदात स्त्रिया साजरा करतात, वडाची झाडाची पुजा करून पतीचा दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. वडाचे खूप महत्त्व आहे. वडाचे झाड केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीनेच नाही,तर वैज्ञानिक दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. त्याचे औषधी गुणधर्म आणि पर्यावरणातील महत्व यामुळे ते एक अद्वितीय वृक्ष मानले जाते.
आपल्याला जगण्यासाठी लागणारा ऑक्सिजन या झाडापासून मिळतो .कोरोना मध्ये याचे महत्व सर्वांना समजलेच आहे. म्हणूनच पुढचा पिढीसाठी प्राणवायू मिळण्यासाठी प्रत्येक स्त्री ने वटपौर्णिमा या दिवशी वडाचे एक झाड लावून ते वाढवले पाहिजे, तेव्हा खऱ्या अर्थाने ती वटपौर्णिमा साजरी होईल. रामलिंग येथे महिलांनी वडाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी केली. यावेळी ग्रा.सदस्य लीलाबाई दौंडकर, ग्रा.सदस्य लता इसवे, ग्रा.सदस्य – यशोधा दसगुडे, तांबे मॅडम, डॉ.स्मिता कवाद, गीता आढाव ,छाया अल्हाड, अर्चना कर्डिले, माया रेपाळे, छाया जगदाळे, राधा रेपाळे, कविता करंजुले, रुपाली बोर्डे, अँटी लोंढे अनेक महिला उपस्थित होत्या. सर्वांचे आभार रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा – राणी कर्डिले यांनी मानले.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…