आरोग्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस ठिक आहे फक्त तुम्ही रागावर आणि वाणीवर कंट्रोल ठेवा. कोणासोबत कडवट बोलू नका, गोड बोलल्यामुळे कामे साध्य होतील. प्रत्येक कामात जोडीदाराचे सहकार्य मिळेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. संध्याकाळी थांबलेले काही काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. रात्री प्रियजनांशी भेटी होतील त्यामुळे मन प्रसन्न राहील.

वृषभ: आजचा दिवस मानसिक समाधान देणार आहे. राजकीय क्षेत्रात असणाऱ्यांना यश मिळेल. सरकारी कामे मार्गी लागतील. नवीन करारांमुळे पद आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. तुम्हाला न आवडणाऱ्या लोकांची भेट झाल्यामुळे थोडा मूड ऑफ होईल. अनावश्यक कष्टांचा सामना करावा लागेल. मुलांकडून चांगले काम होणार आहे.

मिथुन: आजचा दिवस ठिक आहे पण तुम्हाल सतर्क रहावे लागेल कारण मौल्यवान वस्तू चोरी होण्याची किंवा हरविण्याची शक्यता आहे. मुलांच्या शिक्षणासंदर्भात फार चांगली बातमी मिळणार नाही त्यामुळे मन दुःखी होईल. संध्याकाळी काही थांबलेले कार्य पूर्ण होईल. एखाद्या मंगलकार्यात सहभागी होणार आहात.

कर्क: आजचा दिवस ठिक असून तुमच्या कामात प्रगती दिसेल. धनलाभासह मान, प्रतिष्ठा वाढणार आहे. मुलांच्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीन पूर्ण करणार आहात. प्रवास लाभदायक असेल. संध्याकाळी चांगली बातमी मिळेल त्यामुळे मन प्रसन्न होईल. व्यवसायात फोकस ठेवा, नफा अधिक होईल.

सिंह: आजचा दिवस चांगला असून पैसे मिळविण्याचे अनेक मार्ग खुले होतील. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात तिथे तुम्हाला अनेक संधी मिळतील. वाणीवर नियंत्रण राहू दे कारण आदरपूर्वक वागणे तुमचा मान सन्मान वाढवणार आहे. शिक्षण, स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. दिवसभर धावपळ असून डोळ्यांचे आजार डोके वर काढतील. तब्येतीची काळजी घ्या.

कन्या: आजचा दिवस ठिक असून तुमच्या पराक्रमात वाढ होईल. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला यश मिळेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल त्यामुळे मन प्रसन्न राहील. कायदेशीर वादावर तोडगा सापडेल. तुम्ही चांगल्या कामासाठी खर्च करणार आहात.

तूळ: आजचा दिवस चांगला असून आजूबाजूचे वातावरण सुखद असेल. अनेक दिवसांपासून सुरु असणारी आर्थिक समस्या सुटेल. बँक बॅलन्स वाढल्यामुळे तुम्ही गुंतवणुकिचा विचार करु शकता. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे मानसिक समाधान मिळेल. जवळचा किंवा दूरचा प्रवास आहे पण तो पुढे ढकलला जाईल. व्यवसायात लाभ आहे.

वृश्चिक: आजचा दिवस फारसा ठिक नाही. काही आजाक अचानक डोके वर काढतील. तुम्ही वेळेत तपासणी करून घ्या. चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आज जास्त खर्च होणार आहे. कार्यक्षेत्रात वातावरण ठिक असेल. कामे वाढत आहे त्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे.

धनु: अचानक मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती होवून बँक बॅलन्, वाढेल. आज जे काही काम कराल त्याबद्दल सकारात्मक राहा, तुम्हाला मेहनतीचे फळ नक्की मिळेल. समस्यांवर तोडगा काढण्याचा तुमचा प्रयत्न यशस्वी होणार आहे.

मकर: आजचा दिवस अतिशय व्यस्त असणार आहे. व्यवसायाकडे लक्ष देणे ही तुमची प्राथमिकता असायला हवी. दुपारपर्यंत विस्कटलेली व्यवसायाची घडी तुम्ही व्यवस्थित बसविणार आहात. जी कामे राहीली आहेत त्यांना आत्ताच नीट करा कारण नंतर वेळ मिळणे शक्य नाही.

कुंभ: आज सुख समृद्धीचे योग आहेत. तुमचा मान सन्मान वाढेल. तुम्ही जे काही ठरवणार आहात ते काम पूर्ण कराल. विरोधक काहीच करु शकणार नाहीत, तुमची रणनीती अतिशय स्पष्ट असेल, त्यामुळे कामे पटापट मार्गी लागतील. आज कितीही अडचणी आल्या तरी विजय तुमचाच असेल. जे काही बदल होतील ते तुमच्यासाठी सकारात्मक असतील.

मीन: तुमच्या इच्छा पूर्ण होणार, तसेच आज जे काही काम हाती घेणार त्यात तुम्हाला उत्तम यश मिळेल. घरात मंगल कार्याच्या आयोजनाचा योग आहे. तुम्हाला काही आर्थिक व्यवस्था करावी लागेल म्हणजे पुढे सगळं काही व्यवस्थित होईल. धार्मिक कार्यात रुची वाढणार असून प्रवासाचा योग आहे. रात्रीचा वेळ कुटुंबासोबत घालणार आहात.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

8 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago