महाराष्ट्र

महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी मुंबई बँकेचा पुढाकार

मुंबई: महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हे केवळ धोरणांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीतून सिद्ध व्हावे, या उद्देशाने मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या पुढाकाराने एक विशेष बैठक ४ जुलै, २०२५ रोजी पार पडली. बँकेच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहात झालेल्या या बैठकीत महिला बचत गट व व्यावसायीकांना कर्जसुविधा आणि बाजारपेठ निर्मितीशी निगडित विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

यावेळी विधानपरिषद उपसभापती, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, १९९० च्या दशकात सुरू झालेली बचत गट चळवळ ही महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा पाया ठरली आहे. १०-२० रुपयांपासून सुरू झालेली बचत आज हजारो महिलांना स्वावलंबी करत आहे. महिलांनी अंगणवाडी पोषण आहार पुरवठा, शिवणकाम, पाककला, आरोग्य सेवा यासारख्या क्षेत्रांत मोठे योगदान दिले आहे.

त्यांनी असेही स्पष्ट केले की, महिलांना व्यवसाय सुरू करताना प्रशिक्षण, मार्गदर्शन, बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि बँकांशी समन्वय साधणे ही जबाबदारी शासन आणि सहकारी संस्थांची आहे. मुंबै बँकेसारख्या संस्थांनी यामध्ये पुढाकार घेणे अत्यंत स्वागतार्ह आहे, असे त्या म्हणाल्या. यासोबतच, व्यवसाय कल्पना गोळा करून त्यावर आधारित प्रकल्प पुढे नेण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थित महिलांना केले.

मुंबै बँकेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे गटनेते मा. ना. प्रवीण दरेकर यांनी महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी बँकेने घेतलेले उपक्रम स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, “महिलांना फक्त आर्थिक मदत पुरवणे पुरेसे नाही; त्यांना त्यांची क्षमता सिद्ध करता येईल, असे व्यासपीठही आवश्यक आहे.” त्यांनी ‘लाडकी बहिण योजना’, झिरो बॅलन्सवर खाते उघडण्याची सुविधा, आणि महिला बचत गटांसाठी उपलब्ध ३४ वेगवेगळ्या कर्ज योजनांची माहिती दिली.

महिलांसाठी बँकेमार्फत ‘प्रोडक्ट ऑर्डरिंग’, ‘मार्केटिंग’, आणि प्रशिक्षण या बाबींमध्ये सहकार्य मिळेल, असेही त्यांनी आश्वासन दिले. याशिवाय, मुंबै बँकेच्या सर्व शाखांनी पुढील ८ ते १० दिवसांत महिलांकडून व्यवसाय कल्पना संकलित करून त्यावर आधारित योजना विकसित कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

विधानपरिषद आमदार श्रीमती मनीषा कायंदे यांनी महिलांमध्ये असलेल्या सुप्त उद्योजकतेचा उल्लेख केला. आमदार श्री प्रसाद लाड यांनी सांगितले की, त्यांच्या मतदारसंघात हजारो महिलांना व्यवसायासाठी कर्ज, मशिनरी आणि प्रशिक्षण देण्यात आले आहे. ही धोरणे फक्त निवडणुकांसाठी नव्हेत, तर महिलांच्या दीर्घकालीन आर्थिक स्वावलंबनासाठी आहेत, हे त्यांनी ठामपणे सांगितले.

या बैठकीस मुंबै बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, कार्यकारी संचालक संदीप सुर्वे, संचालक मंडळ सदस्य, तसेच शिवसेनेच्या महिला पदाधिकारी शीतल म्हात्रे, कला शिंदे, तृष्णा विश्वासराव, सुवर्णा करंजे, वीणा भागवत आणि लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सहकारी बँकांनी सामाजिक बांधिलकी म्हणून महिला सबलीकरणासाठी अधिक सक्रिय भूमिका घ्यावी, यावर सर्वांनी भर दिला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापुर पोलिसांचा बीडमध्ये छापा; साडेचार लाखांचे दागिने हस्तगत, एक आरोपी गजाआड

शिरुर (तेजस फडके) ‘तुमच्याकडील सोन्यापेक्षा हे बिस्कीट अधिक वजनाचे आहे,’ असे भासवून महिलेचा विश्वास संपादन…

9 तास ago

सहकार वाचवण्याचे मोठे आव्हान; सत्ताधारी सहकाराचे नाही तर ‘स्वाहाकाराचे’; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशाच्या प्रगतीमध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू…

10 तास ago

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

1 दिवस ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

1 दिवस ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

1 दिवस ago

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…

1 दिवस ago