आरोग्य

जाणून घ्या आपल्यासाठी आजचा दिवस कसा असेल…

मेष: आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्या घरात आज पाहुण्यांचं आगमन होण्याची शक्यता आहे. तसेच, आज दिवसभरात तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. आज दिवसभरात तुम्ही खूप मेहनत घ्याल. या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळे. आज मीडिया, आयटी सेक्टर आणि सामजिक क्षेत्रातील लोक कामात खूप व्यस्त असतील.

वृषभ: आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमची आवडती वस्तू जी हरवली होती ती तुम्हाला पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. आज तुमच्यावर जबाबदारीचा वाढता ताण असेल. त्यामुळे वेळ मिळेल तसा आराम करत राहा. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. तसेच, निरोगी जीवनशैली जगण्याचा प्रयत्न करा.

मिथुन: आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. तुमच्या कुटुंबातील वातावरण फार सकारात्मक असेल. तुम्हाला जर वाहन खरेदी करायचं असेल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आजच्या दिवसात तुमच्याकडून जास्त पैसे खर्च केले जाऊ शकतात. तसेच, आजचा दिवस चांगल्या कामासाठी खर्च करा.

कर्क: आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच, कुटुंबियांकडून तुम्हाला एखादं सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात तुमच्या पत्नीबरोबर तुमचा व्यवहार चांगला असेल. तसेच, छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये तुम्ही आनंद मानाल.

सिंह: आजचा दिवस शुभकारक असणार आहे. तुमच्या मान-सन्मानात चांगली वाढ होईल. तसेच, वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. जर तुमच्या कुटुंबात अनेक दिवसांपासून एखाद्या लमस्येवर वाद सुरु असतील तर तो वाद लवकर संपण्याची शक्यता आहे. दिवसाच्या शेवटी तुम्हाला शुभवार्ता मिळेल. आजचा दिवस तुमचा सकारात्मक जाईल.

कन्या: आजचा दिवस फलदायी असणार आहे. आज तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली असेल. तसेच, तुमच्या व्यवसायात चांगली वाढ झालेली असेल. कामानिमित्त तुम्हाला परदेशात जाण्याची संधी लवकरच चालून येईल. तसेच, तुम्ही केलेल्या मेहनतीचं तुम्हाला चांगलं फळ मिळेल. फक्त मेहनत करत राहा. मित्रांबरोबर गाठीभेटी होतील.

तूळ: सभोवतालचं वातावरण प्रसन्न राहील, त्यांना एकामागून एक चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी आज तुम्ही मोठी गुंतवणूक करू शकतो. शेअर मार्केटशी संबंधित लोकांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला काही नवीन मालमत्ता मिळेल. तुम्हाला तुमच्या भावा-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. नोकरी-संबंधित कामाबाबत कुटुंबातील सदस्याला परस्पर सल्ला घ्यावा लागेल.

वृश्चिक: आजचा दिवस प्रेम आणि सहकार्याची भावना वाढवणारा असेल. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यातही तुम्हाला खूप रस असेल. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवल्याने तुमचं नुकसान होईल. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसह चांगल्या भजनांचा आनंद घ्याल. तुमच्या मुलाची प्रगती पाहून तुम्हाला आनंद होईल.

धनु: आजचा दिवस खूप फलदायी असणार आहे. तुमच्या जोडीदाराला काही कामात चढ-उतार जाणवतील. कुटुंबातील एखाद्या सदस्याला नवीन नोकरी मिळाल्यामुळे त्यांना घरापासून दूर जावं लागू शकतं. काही महत्त्वाच्या कामासाठी तुम्हाला सहलीला जावं लागू शकतं. व्यवसायात तुमच्या योजना फलदायी ठरतील, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आठवणींनी तुम्हाला पछाडलं असेल.

मकर: आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी आदर, मान-सन्मान वाढवणारा आहे. आज एखादं सरप्राईझ मिळाल्याने तुम्हाला खूप आनंद होईल. व्यवसायात चांगला नफा मिळेल. काही मित्रांसोबत सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. कुटुंबात काही शुभ कार्यक्रम आयोजित केल्यामुळे वातावरण प्रसन्न राहील. तुमच्या सहकाऱ्यांबद्दल तुम्हाला वाईट वाटेल. आर्थिक लाभ मिळाल्यास तुमच्या आनंदाला सीमा उरणार नाही.

कुंभ: आजचा दिवस संमिश्र असणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदात वेळ घालवाल. जर तुम्ही तुमच्या जोडीदारावर कामाबाबत रागावला असाल तर तो राग आणखी वाढू शकतो, त्यामुळे त्यांनी एखादी विनंती केली असेल तर तुम्ही ती पूर्ण केलीच पाहिजे. तुम्हाला काही शारीरिक समस्या उद्भवू शकतात. अतिउत्साहाने कोणतंही काम करणं टाळावं लागेल.

मीन: आज पैशाशी संबंधित स्थिती उत्तम राहतील. तुमच्या काही कामात अडथळा निर्माण होऊ शकतो. तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांकडून तुम्हाला भरपूर पाठिंबा आणि सहकार्य मिळेल. तुमच्या विचाराने आणि समजुतीने सर्व कामं पूर्ण होतील आणि प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडून तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज आरोग्य ठणठणीत राहील.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर! करडे गावात मध्यरात्री पिस्तुलातून तीन राऊंड फायर; गुन्हा दाखल; पाहा नावे…

सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…

3 तास ago

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

11 तास ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

21 तास ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

21 तास ago

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…

21 तास ago

‘ईशान सेतू’ने महाराष्ट्र-ईशान्य भारत जोडला; मणिपूरमध्ये सिद्धिविनायकाची प्रतिकृती उभारणार; एकनाथ शिंदे

ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…

21 तास ago