आरोग्य

हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाण्याचे आरोग्यदायी फायदे

हिवाळ्यात जेव्हा तापमान कमी होत जाते, तेव्हा आपल्या शरीराला थंडीशी लढण्यासाठी, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, तसेच उर्जा टिकवून ठेवण्यासाठी पोषक घटक हवे असतात. गरम सूप आणि चहा हे हिवाळ्यात सेवन करता येईल, असे महत्त्वाचे पदार्थ आहेत. तसेच, पालेभाज्या सुद्धा हिवाळ्यात पौष्टिक घटकांचा मुख्य स्रोत आहेत. हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाण्याचे आरोग्यदायी फायदे आहेत.

आरोग्यदायी हिरव्या पालेभाज्या

पालक: पालकामध्ये लोह, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी व फोलेट भरपूर प्रमाणामध्ये असते. पालक ॲनिमियाचा सामना करण्यासाठीही मदत करते; तसेच रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढवते. पालकमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिनसारखे अँटिऑक्सिडंट्स असतात, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. त्याशिवाय त्यामधील मॅग्नेशियम ऊर्जा पातळी टिकवून ठेवण्यास मदत मिळते. पालक हा फायबरचा एक चांगला स्रोत आहे; जो पचनक्रिया सुधारतो. सूप, करी किंवा सॅलडमध्ये पालकचा वापर केला जातो. मसाले आणि इतर घटकांचा समावेश पालकाची चव आणखी वाढते.

केल: केल ही एक पालेभाजी असून, ती आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असते. त्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी व के भरपूर प्रमाणात असतात. या भाजीमध्ये भरपूर कॅल्शियम असते, जे हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते आणि ते आजारांपासून दूर ठेवते.

मोहरीच्या पानांची भाजी: आशियाई आणि भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये लोकप्रिय असलेली भाजी म्हणजे मोहरीच्या पानांची भाजी. या भाजीमध्ये सी, के व बीटा-कॅरोटीन ही व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. मोहरीच्या हिरव्या भाज्यांमध्ये सल्फरयुक्त संयुगे असतात; जी नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करतात आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करतात.

मेथीची पाने (मेथी): मेथीमध्ये लोह, फायबर व प्रोटीन्स यांचे प्रमाण भरपूर असते; ज्यामुळे थकवा दूर राहून, ऊर्जा टिकण्यासाठी साह्य मिळते. मेथीच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यासाठी पराठा, डाळ, भाज्यांमध्ये मेथीचा समावेश करावा.

काश्मिरी साग: ही भाजी सर्वांत जास्त काश्मीरमध्ये दिसून येते. त्यामध्ये व्हिटॅमिन के, कॅल्शियम आणि सहज विरघळणारे फायबर खूप जास्त प्रमाणात असतात. ही भाजी कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते आणि हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते. या भाजीमध्ये ग्लुकोसिनोलेट्सदेखील असतात, जे कर्करोगाशी लढण्यास मदत करतात. हिवाळ्यात ही भाजी खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जाते.

राजगिरा पाने: राजगिरा म्हणजे लाल पालक, ज्याला आपण लाल माठाची भाजी, असेसुद्धा म्हणतो. त्यामध्ये लोह, कॅल्शियम व पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते; जे स्नायू आणि हाडांचे आरोग्य जपण्यासाठी फायदेशीर आहे. राजगिरा हा फायबरयुक्त असून, त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्सचासुद्धा समावेश आहे; जे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात. त्याशिवाय राजगिऱ्याची भाजी ऑक्सिडेटिव्ह तणावसुद्धा कमी करते.

तुम्हाला आवडतात त्या हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करा. या भाज्या ओल्या कापडात किंवा किंवा पेपर टॉवेलमध्ये गुंडाळून फ्रिजमध्ये ठेवा आणि वापरण्यापूर्वी या भाज्या त्यावरील धूळ किंवा कीटकनाशके दूर करण्यासाठी नीट स्वच्छ करून घ्या.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दानशूरतेतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख; युवा उद्योजक अमोल पुंडे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली

पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…

7 मिनिटे ago

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

19 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

19 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

19 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

19 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

1 दिवस ago