आजकालच्या खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीची लाइफस्टाईल यामुळे लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होत आहेत. शरीर आतून कमजोर होत आहे. रोज शरीरात टॉक्सिन जमा होतात. हे रक्त, किडनी, लिव्हर आणि फुप्फुसांसारख्या अवयवांमध्ये जमा होतात. जर यांची स्वच्छता केली गेली नाही तर कॅन्सर, इन्फेक्शनसारख्या आजारांचा धोका वाढतो.
लिवर-किडनी होईल डिटॉक्स
किडनी आणि लिव्हर डिटॉक्स करण्याची पद्धत सांगितली आहे. जेव्हा किडनी आणि लिव्हर टॉक्सिनच्या संपर्कात येते तेव्हा दोन्ही अवयव त्यांची कामे व्यवस्थित करत नाहीत. ज्यामुळे सूज येऊ शकते आणि हळूहळू हे अवयव डॅमेज होऊ शकतात.
कोणत्या समस्या होतील दूर
या डिटॉक्स ड्रिंकने लिव्हर टॉक्सिनची समस्या, किडनीतील विषारी पदार्थाची समस्या, बॉडी डिटॉक्स, अॅसिडिटी, यूरिन ट्रॅक्ट इन्फेक्शन, किडनी स्टोन, पीसीओडी किंवा पीसीओएस, वाढलेलं वजन, हाय ब्लड शुगर अशा समस्या दूर करण्यास मदत मिळू शकते.
कसं तयार कराल जवाचं ड्रिंक
जव या धान्यातून आपल्या शरीराला अनेक पोषक तत्वे मिळतात. त्यासोबतच जवाच्या मदतीने अनेक रोगांपासूनही बचाव केला जाऊ शकतो. जव ही गव्हाचीच एक प्रजाती आहे. पण जव गव्हाच्या तुलनेत हलकं आणि जाड धान्य आहे. जवामध्ये मुख्यत्वे लेक्टिक अॅसिड, सॅलिसिलीक अॅसिड, फॉस्फोरिक अॅसिड, पोटॅशिअम आणि कॅल्शिअम उपलब्ध असतात.
मुठभर जव २ ग्लास पाण्यात उकडा. जेव्हा पाणी एक ग्लास शिल्लक राहील तेव्हा गॅस बंद करा. नंतर हे गाळून घ्या. हे पाणी अर्धा ते एक तासात एक एक घोट करत सेवन करा.लागोपाठ ३० दिवस याचं सेवन केल्याने वेगवेगळ्या समस्या दूर होतील.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…