आरोग्य

आरोग्यदायी अक्रोड

विविध प्रकारच्या ड्राय फ्रुट मधले हे एक दर्जेदार, पौष्टिक फळ आहे. अक्रोडात अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळत असून शरिराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे अतिशय फायदेशिर आहे. अक्रोडला ‘ब्रेन फूड’ असे म्हणतात. यात खुप प्रकारचे विटामिन असतात, जसे कि, विटामिन A, B, C, VitB12, विटामिन D, म्हणूनच याला विटामिनचा राजा म्हणतात. अक्रोड मेंदूसाठी खुप फायदेशिर आहे. हे जवळपास मानवी मेंदू सारखेच दिसते. याच्या सेवनाने मानसिक ताण दूर होतो, मन प्रसन्न होते, बौद्धिक पातळी वाढते, स्मरणशक्ति वाढते. अक्रोडात शक्तिशाली न्यूरो प्रोटेक्टिव कंपाउंड सारखे विटमिन E, Omega-3 फॅटी ऍसिड व एंटि आँक्सिडंट असतात. ज्यामूळे मेंदूला सुरक्षा मिळते.

अक्रोड हे हृदयासाठी लाभदायक आहे. याच्या सेवनाने शरिरातील चरबी कमी होते, कोलेस्ट्रोल नियंत्रणात राहते. कारण ओमेगा-3 फँटि एसिड जे हार्टकरता उपयोगी आहे, ते विपुल आहे. अक्रोडात Polyphenols या कँसरविरोधी घटकाचे प्रमाण जास्त असते, त्यामूळे दररोज अक्रोड खाल्ल्यामुळे ब्रेस्ट कँसर, प्रोस्टेट कँसर, व मलाशयाचा कँसर होण्याचा धोका कमी होतो. अक्रोड खाण्यामुळे भूक कमी लागते, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी उपयोग होतो, व याच कारणामूळे डायबेटिस-२ आटोक्यात राहतो. अक्रोडामूळे रक्तातील साखर नियंत्रित राहते. उच्च रक्तदाब आटोक्यात राहतो. अक्रोड हा दुर्बल, अशक्त व्यक्तिंकरता खूपच लाभदायी आहे, सकाळी उठून २-३ अक्रोडाचे सेवन करावे, वरून एक कप दूध घ्यावे.

ज्या पुरूषात शुक्रजंतू कमी असतात, ज्यामूळे ते प्रजोत्पादन करू शकत नाही, अशांनी नियमित अक्रोडाचे सेवन केल्यास फायदा होतो. अक्रोड हे वातघ्न असल्याने संधिवात, सायटिकि, सांधेदुखी, आमवात, या आजारावर चांगले परिणाम देते. ज्यांना गुडघे दुखीचा तीव्र स्वरूपात त्रास आहे, त्यांनी सकाळी उठुन ३-४ अक्रोडाचे सेवन करावे. अक्रोडाचे तेल नियमित सेवन केल्यास, आतड्यातील कृमी नाश पावतात व शौचावाटे बाहेर पडतात. हे सारक गुणधर्माचे असल्याने बद्धकोष्ठ, मलावरोध असणाऱ्यांनी अक्रोडाचे नियमित सेवन करावे, यात फायबर विपुल असल्याने वरिल त्रास होत नाही.

अक्रोड वनस्पतीची साल व पाने गंडमाळा, पुरळ, उपदंश, व त्वचारोग आदि रोगावर उपयोगी आहे. अक्रोडाची पाने कृमीनाशक आहे. चेहऱ्यावरील काळे वांग, पिगमेटेशन, पुरळ असणाऱ्यांनी, अक्रोड बारिक वाटुन त्याचा लेप लावावा, चेहरा सुंदर होतो. अक्रोड बीज तेल हे साबण, व सौंदर्यवर्धक गोष्टित वापरतात. सहसा जेवणानंतर अक्रोड खावा, यामूळे जेवणाचे पचन चांगले होते. अकाली केस पांढरे होणे, केस गळणे या तक्रारिंवर, अक्रोड सिध्द तेल वापरल्यास केस काळेभोर, व दाट होतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पिंपरखेडमध्ये शिव पाणंद शेत रस्ते चळवळीच्या समन्वयाने शेतरस्ता खुला

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर. तालुक्यातील पिंपरखेड येथील बोंबे वस्तीवर जाणारा शेतरस्ता दीड वर्षांपासून वादग्रस्त ठरला…

12 तास ago

शिरुर तालुक्यात कंपनीतुन तब्बल १६ लाखांची कॉपर ट्यूब चोरी; औद्योगिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह…?

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील करडे हद्दीत असलेल्या एस. व्ही. एस. रेफकॉम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून…

12 तास ago

कारेगावात “शिवतीर्थ प्रतिष्ठान” तर्फे भव्य सार्वजनिक नवरात्रोत्सव

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कारेगाव (ता. शिरुर) येथे संस्कृती आणि कला यांचा संगम घडवणारा 'सार्वजनिक…

1 दिवस ago

रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत २८ किलो गांजा जप्त; महिलेसह एक आरोपी अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या पथकाने अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली.…

2 दिवस ago

सरकारच्या निष्क्रियतेमुळे तरुणांच्या आत्महत्या वाढत आहेत; ॲड. संग्राम शेवाळे

मुंबई (प्रतिनिधी) राज्यात दरवर्षी हजारो तरुण आत्महत्या करत आहेत. हि केवळ आकड्यांची बाब नाही, तर…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यात प्रशासनाकडुन गोपनीयता फाट्यावर; तक्रारदारचं असुरक्षित…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात तहसिल प्रशासनाची बेपर्वाई आणि निष्काळजीपणा वेळोवेळी उघड होत असुन तक्रारदाराने…

2 दिवस ago