आरोग्य

काहीही खाल्लं तरी छातीत जळजळ होते, लगेच करा हे सोपे उपाय झटक्यात मिळेल आराम…

जेवण केल्यानंतर अनेकदा अनेकांना छातीत जळजळ होते. ज्याला हार्टबर्न किंवा अ‍ॅसिड रिफ्लक्स म्हटलं जातं. छातीत जळजळ होत असल्यानं अस्वस्थ जाणवतं आणि कोणत्याही कामात मन लागत नाही. मुळात छातीत जळजळ तेव्हा होते, तेव्हा पोटात अ‍ॅसिड अन्ननलिकेत परत जातं. जास्तकरून मसालेदार, तळलेले-भाजलेले किंवा जास्त आंबट पदार्थ खाल्ल्यास ही समस्या होते. त्याशिवाय जास्त खाणं किंवा घाईघाईनं खाल्ल्यास सुद्धा ही समस्या होते. अशात ही समस्या दूर करण्याचे काही सोपे घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१) पाणी प्या: जेवण केल्यावर लगेच पाणी पिणं एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. पाण्यानं पोटातील अ‍ॅसिड पातळ करण्यास मदत मिळते, ज्यामुळे छातीत जळजळ कमी होते. त्याशिवाय यानं तुमचं पचन तंत्रही मजबूत करण्यास मदत मिळते. पाणी कमी असल्यानं सुद्धा ही समस्या होऊ शकते, त्यामुळे शरीरात पाणी कमी होऊ देऊ नका.

२) आले खा: आल्यामध्ये नॅचरल अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात, जे पोटातील अ‍ॅसिड संतुलित करण्यास मदत करतात. जेवण केल्यानंतर आल्याचा एक छोटा तुकडा चावून खाऊ शकता किंवा आल्याचा चहा बनवू शकता. यानं जळजळ तर कमी होईलच, सोबतच पचनासही मदत मिळेल. नियमितपणे आल्याचं सेवन केलं तर पचन तंत्र मजबूत राहतं.

३) बडीशेप खा: बडीशेप खाल्ल्यानं पचनक्रिया चांगली होते आणि अ‍ॅसिडचं उत्पादन नियंत्रित होतं. जेवण केल्यावर बडीशेप चावून खाल्ल्यास छातीतील जळजळ लगेच कमी होते. यानं पोट शांत होतं आणि जळजळ दूर होते. रोज जेवण झाल्यावर नियमितपणे बडीशेप खाल तर ही समस्या होणार नाही.

४) बेकिंग सोडा व पाणी: बेकिंग सोडा अ‍ॅसिडला न्यूट्रल करतो आणि पोटातील जळजळ कमी करतो. एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून प्यायल्यास जळजळ कमी होईल. फक्त हा उपाय नेहमी नेहमी करू नका. कारण यानं पोटातील अ‍ॅसिड अधिक कमी होतं.

५) अ‍ॅपल सायडर व्हिनेगर: अ‍ॅपल सायडर व्हिनेगर पाण्यात टाकून प्यायल्यास जळजळ दूर होते. यानं पोटातील अ‍ॅसिडचं प्रमाण नियंत्रित होतं आणि पचनास मदत मिळते. एक ग्लास पाण्यात एक चमचा अ‍ॅपल सायडर व्हिनेगर टाकून प्यायल्यास पोटातील अ‍ॅसिड रिफ्लक्सची समस्या दूर होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

22 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

22 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

23 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago