आरोग्य

केसांच्या समस्येसाठी घरगुती उपाय

केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय

१) एका अंड्यातील पांढऱ्या भागामध्ये एक टिस्पून ऑलिव्ह ऑइल मिसळा.

२) मिश्रण चांगले एकजीव होईपर्यंत ढवळा. त्यानंतर हे मिश्रण टाळूला व केसांना लावा. 15 ते 20 मिनिटांनंतर सौम्य शँम्पू लावून थंड पाण्याने केस धुवा.

केस मऊ होण्यासाठी काही उपाय

१) एक कप दह्यात अंड्यातील पिवळा बलक घालून मिश्रण व्यवस्थित एकत्र करा.

२) केसांना लावा आणि 20 मिनिटांनंतर थंड पाण्याने केस स्वच्छ धुवा म्हणजे अंड्याचा वास निघून जाईल.

केसांना कंडीशनिंग होण्यासाठी टिप

१) एका वाटीमध्ये अंड्याचा पिवळा बलक घेऊन त्यात एक टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल मिसळा. मिश्रण एकजीव होईपर्यंत एकत्र करा. मिश्रण थोडे पातळ होण्यासाठी त्यात थोडे कोमट पाणी मिसळा.

२) केस धुतल्यानंतर हे मिश्रण केसांना लावा. काही वेळ तसेच राहू द्या आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवा.

नियमीत मालिश

१) केसांना नियमित हलक्या हाताने मालीश करावे. यामुळे आपले केस निरोगी राहतात. मसाजसाठी शक्यतो बदामाच्या तेलाचा वापर केल्यास उत्तम.

केस गळतीची समस्या दूर

१) लसुन, कांदा अथवा आले यांचा रस काढून तो केसांच्या मुळांना लावावा. रात्री केसांना रस लावून सकाळी केस स्वच्छ धुवावेत. यामुळेही केस गळतीची
समस्या दूर होते.

२) एक कप पाण्यात दोन बॅग ग्रीन टी मिसळून हे पाणी केसांच्या मुळांना लावावे. एका तासानंतर केस धुवावे. यामुळे केस गळती थांबून केस मजबूत होतात.

३) कांद्याचा रस लावा. अर्धा तासानंतर धुऊन टाका. यामुळे डोक्याची तब्येत चांगली होतील.

४) तुमचा खुराक चांगला असला पाहिजे. चांगले केस चांगल्या तब्येतीवर सजलेले दिसतात. प्रोट्रीनयुक्त अन्न खा. दूध, मासे, पनीर खा.

५) ओल्या केसांना रगडून पुसू नका. केस सुकल्यानंतर त्यावर कंगवा फिरवा.

६) तेल सामान्य तापमान किंवा गरम नसावे. कोमट असावे.

७) डोकं वर करुन आणि पद्धतशीर चाला.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव मध्ये सगळे दिग्गज एकत्र असुनही अशोक पवार यांचे कट्टर समर्थक राहुल गवारे यांची एकाकी लढत

कारेगाव (तेजस फडके) शिरुर लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन ११ दिवस उलटूनही शिरुर तालुक्यात अजुनही…

7 तास ago

रांजणगाव MIDC मध्ये आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी देण्याच्या बहाण्याने होतेय मोठी आर्थिक फसवणुक…

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यात आशिया खंडातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC त राष्ट्रीय…

15 तास ago

विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन शेळ्याही जागीच दगावल्या…

अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी गावात पडलेल्या विजेच्या तारांचा शॉक लागून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची…

18 तास ago

रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने जागतिक रक्तदाता दिनानिमित निलेश खाबिया व अनिल बांडे यांचा सत्कार

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) जागतिक रक्त संक्रमणामध्ये रक्तदानाची चळवळ महत्वपूर्ण ठरत आहे. रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय…

1 दिवस ago

शिरुर पोलिसांच्या संयुक्त बैठकीला चोरट्यांनी दिले खुले आव्हान…

एका रात्रीत केली तीन विद्युत रोहीत्रांची चोरी सविंदणे (अरूणकुमार मोटे): शिरूर पोलिसांच्या संयुक्त बैठकीला चोरट्यांनी…

2 दिवस ago

शिरुर; चारचाकी गाड्यांना अनधिकृत पाट्या तसेच अवैध दारुविक्रीबाबत मातंग नवनिर्माण सेना आक्रमक…

शिरुर (तेजस फडके) पुणे जिल्ह्यात तसेच शिरुर तालुक्यातील अनेकजण महाराष्ट्र शासन, आमदार, पोलिस, प्रेस तसेच…

3 दिवस ago