आरोग्य

काही आजारांवर घरगुती उपाय

१) सर्दी खोकला

उपाय:- लवंग , मनुका यांचा काढा व मध यांच्या गुळण्या कराव्यात. वेखंडाची धुरी घ्यावी. सुंठवडा खावा. ज्येष्ठमध काढा + मध व खडीसाखर घालून घ्यावा.

२) वारंवार तहान लागणे

उपाय:- खजूर पाण्यात भिजत ठेवावी, १ तासाने हे पाणी गाळून पिण्यास द्यावे. डाळिंबाचा रस प्यावा.

३) भूक न लागणे

उपाय:- ताजे ताक व वेलची पावडर + खडीसाखर घालून प्यावे. मूगडाळीचे सूप प्यावे.

४) पोटदुखी

उपाय:- पोटावर चंदनाचा लेप लावावा. गुलाब पाकळ्या पिण्याच्या पाण्यात टाकाव्यात व हे पाणी प्यावे.

५) वजन कमी होणे

उपाय:- 1 ग्लास दुध + १ चमचा शतावरी पावडर , आक्रोड , काजू पावडर खाण्यात ठेवावी. काळी खजूर तुपात भिजत ठेवावी , दररोज सकाळी २ व रात्री २ खजूर खाव्यात.

६) केस गळणे

उपाय:- बदाम तेलाने केसांना मसाज करावा.

७) स्त्रियांमध्ये अंगावरून जास्त जाणे

उपाय:- १ कप दुध + पाव चमचा सुंठ पावडर + १ चमचा शतावरी पावडर घ्यावी. गुलाब पाकळ्या व मध एकत्र करून खावे.

८) संडासावाटे रक्त पडणे

उपाय:- बेलचा मुरंबा खावा.

९) नाकातून रक्त येणे

उपाय:- दुर्वांचा रस २ थेंब नाकपुडीत टाकावा.

१०) डायबेटीस

उपाय:- हळद, जांभूळ बी पावडर व आवळा पावडर प्रत्येकी समभाग घेऊन सकाळी उपाशीपोटी खावी.

११) सांधेदुखी, कटकट आवाज येणे

उपाय:- हळदीने सिद्ध केलेल्या खोबरेल तेलात कापूर टाकून सांध्याना मसाज करावा. दुखणाऱ्या भागावर ज्येष्टमध पावडरचा लेप लावावा. १ कप दुध + १/२ चमचा डिंक पावडर + १ चमचा खारीक पावडर असे मिश्रण जेवणानंतर १ तासाने प्यावे.

१२) चक्कर येणे

उपाय:- सकाळी उपाशीपोटी मोरावळा खावा. डाळिंब, संत्री, मोसंबी, लिंबू, द्राक्षे यापैकी उपलब्ध असेल त्या फळाचा रस घ्यावा.

१३) मानसिक ताण

उपाय:- दीर्घश्वसन करा. अनुलोम – विलोम प्राणायम करा.

१४) मैथुन इच्छा उत्पन्न न होणे

उपाय:- तुपात केलेले उडीद पीठाचे लाडू खावेत. दुध व केशर रोज झोपण्यापूर्वी घ्यावे.

१५) संडासला कडा बनणे

उपाय:- १५ काळ्या मनुका रात्री पिण्याच्या पाण्यात भिजवाव्यात सकाळी उपाशीपोटी खाव्यात.

१६) लघवीला जळजळ होणे

उपाय:- १ ग्लास पाणी + १ चमचा धना पावडर + १ चमचा मध हे मिश्रण प्यावे.

१७) घामामुळे अंगाला दुर्गंध येणे

उपाय:- चंदन , कापूर पावडर अंगाला चोळावी.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

1 दिवस ago