आरोग्य

हाडांचे आरोग्य जपण्यासाठी घरगुती उपाय

अनेकदा आपल्याच चुकांमुळे हाडांचे आरोग्य बिघडू शकते. यासाठी काय करायला हवं, कोणत्या चुकांमुळे हाडाचे आरोग्य बिघडू शकते, त्यावर काय उपाय करायला हवे, याविषयी जाणून घेऊया.

अनेकांना स्लिप डिस्कच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. मणक्यात ही समस्या उद्भवते. सॅपिन ही एक साखळी हाडे आहेत. दैनंदिन जीवनातील शरीराच्या कार्यात ते आपल्याला मदत करतात. त्यांच्या शिवाय जगणे अवघड होते. या हाडांचा कोणताही भाग त्याच्या जागेवरून किंचित हलत असेल तर या अवस्थेला स्लिप डिस्क म्हणतात. जे आपल्या शरीराच्या हालचालींची काळजी घेत नाहीत त्यांना ही समस्या उद्भवू शकते.

पाठीच्या कण्यातील प्रत्येक डिस्कचे दोन भाग असतात. यात आतील भाग मऊ आणि बाहेरचा भाग घन असतो. सहसा, दुखापत आणि अशक्तपणामुळे, डिस्कचा आतील भाग बाह्य रिंग मधून बाहेर पडतो. हे स्लिप, हर्निएटेड किंवा प्रोलॅप्स्ड डिस्क म्हणून ओळखले जाते. अशा वेळी शरीराच्या मागच्या भागात तीव्र वेदना आणि अस्वस्थता जाणवते. स्लिप डिस्क मुळे मज्जातंतू संकुचित झाल्या असतील तर यामुळे तो भाग सुन्न देखील होतो. ही समस्या प्राथमिक अवस्थेत असल्यास फिजिओथेरपी आणि औषधांच्या साहाय्याने ती दुरुस्त करता येते, परंतु गंभीर अवस्थेत शस्त्रक्रियेची गरज असते.

स्लिप डिस्कची कारणे

वाढत्या वयामुळे.

जास्त वजन उचलल्यामुळे.

जड व्यायाम चुकीच्या पद्धतीने केल्याने.

जास्त शारीरिक हालचाली.

स्लिप डिस्क कशी टाळावी

क्षमतेपेक्षा जास्त वजन कधीही उचलू नये.

वजन जास्त वाढू देऊ नये.

ऑफिस मध्ये ८ ते १० तास एकाच स्थितीत बसू नये.

कामाच्या वेळेत खुर्चीवरून उठून फिरायला जावे.

ट्रेनर किंवा तज्ञांच्या सल्ल्या शिवाय व्यायाम करू नये.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video; वाळू माफिया दिवसाढवळ्या घोड धरणाचे लचके तोडत असताना पुणे आणि अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष…?

शिरुर (तेजस फडके) चिंचणी (ता. शिरुर) शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतीसाठी जीवनदायिनी ठरलेल्या चिंचणी (ता.…

14 तास ago

पिंपरी-चिंचवड पोलिसांना आधुनिक तंत्रज्ञानाचे बळ! ६५ नवीन वाहने, ४ ड्रोन अन् AI CCTV नेटवर्क

पिंपरी-चिंचवड : वाढत्या पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षिततेचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला राज्य सरकारने…

1 दिवस ago

पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निकालांचे काँग्रेसकडून पोस्टमार्टम

थोरात, हंडोरे, नसीम खान यांच्यासह चौघांची समिती; तीन आठवड्यांत अहवाल सादर होणार मुंबई: नागपूर पदवीधर,…

1 दिवस ago

काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्व ॲक्शन मोडमध्ये

मुंबई: महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्वाने आता नियोजनबद्ध पावले उचलण्यास सुरुवात…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा; वृद्ध महिलेचे दागिने ओरबडल्याने रक्तबंबाळ…

शिरूर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथील मलठण-शिक्रापूर रस्त्यावरील एकनाथ दंडवते यांच्या घरावर रात्री सुमारे…

2 दिवस ago

झटपट रक्त वाढवण्याचे घरगुती उपाय

अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण…

2 दिवस ago