आरोग्य

उकडल्यानंतर दुप्पट पौष्टिक बनतात या गोष्टी, शरीराला मिळतात डबल फायदे

भाज्या कच्च्या खाव्यात की उकडून यावरून अनेक वाद पेटलेला असतो. सामान्यपणे असं मानलं जातं की, काही भाज्या किंवा फळं कच्चे खाणंच जास्त फायदेशीर असतं. कारण यातून शरीराला जास्त पोषक तत्व मिळतात. मात्र, अशाही बऱ्याच भाज्या आणि फळं आहेत जे उकडून खाल्लेत तर त्यातील पोषक आपल्या शरीराला दुप्पट फायदेशीर ठरू शकतात. काही खाद्यपदार्थ उकडून खाल्ल्याने त्या पोषक तत्वांच्या पावरहाऊस बनतात. इतकंच नाही तर उकडलेल्या गोष्टी खाल्ल्याने आपल्या शरीराची पचनक्रिया आणखी चांगली होते. अशात ५ खाद्य पदार्थांबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पालक: पालक उकडल्यानंतर त्यातील ऑक्सालेट लेव्हल कमी होते. ज्यामुळे कॅल्शिअम आणि आयर्नचं अवशोषण वाढतं. ज्या लोकांच्या शरीरात कॅल्शिअम आणि आयर्न कमी आहे अशा लोकांसाठी उकडलेली पालक जास्त फायदेशीर ठरते. तसेच उकडलेली पालक पचन होण्यासही सोपी असते.

टोमॅटो: टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचं एक शक्तीशाली अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आढळतं. जे कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करतं. टोमॅटो उकडल्याने हे तत्व आणखी मजबूत होतं.

ब्रोकली: ब्रोकल उकडल्याने ग्लूकोसायनोलेट्स रिलीज करण्यास आणि त्याचं बॅलन्स ठेवण्यास मदत मिळते. ग्लूकोसायनोलेट्स कंपाउंडचा एक असा समूह आहे ज्याने कॅन्सर मुळापासून ठीक करण्यास मदत मिळते. उकडल्यानंतर ब्रोकली नरम होते ज्यामुळे ती चावणं आणि पचनही सहजपणे होते.

रताळी: रताळ्यांमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. रताळी उकडल्याने यातील बीटा कॅरोटीनची शक्ती आणखी वाढते. यातून मिळणारं व्हिटॅमिन ए तुमच्या डोळ्यांसाठी, इम्यूनिटी वाढवण्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर असतं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago