आरोग्य

तुरटीचा वापर कसा व कशासाठी करावा

निरोगी दात

तुरटीचे दातासाठी खूपच फायदे आहेत. एका अभ्यासानुसार, जर तुरटीने दाताची स्वच्छता केली तर दाताची कॅव्हिटी आणि दात तुटण्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. त्यासाठी तुम्ही तुरटीचा उपयोग माऊथवॉश म्हणूनही करू शकता. तुम्हाला दातांच्या काही समस्या असतील तर तुरटी हा त्यावर रामबाण उपचार आहे. तुम्हाला जास्त त्रास न होता तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता. एका ग्लासात पाणी गरम करा आणि त्यात चिमूटभर मीठ आणि एक लहानसा चमचा तुरटी पावडर घालून मिक्स करा. थंड झाल्यावर तुम्ही या पाण्याचा वापर दातांसाठी करा.

शरीराच्या दुर्गंधीपासून सुटका

जर तुमच्या शरीराला घामामुळे खूपच दुर्गंधी येत असेल तर तुम्ही तुरटीचा वापर करू शकता. तसंच तुमच्या पायाला सतत दुर्गंधी येत असेल तरीही तुरटीचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता. ही दुर्गंधी हटविण्यासाठी तुम्ही आंघोळ करत असलेल्या पाण्यात तुरटीचा उपयोग करा अथवा दुर्गंधी घालवण्यासाठी तुम्ही आफ्टर शेव्ह, डिओ अथवा बॉडी लोशन अशा प्रकारेही वापर करू शकता. याचा तुमच्या शरीरावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. तर शरीरावरील बॅक्टेरिया मरून दुर्गंधी कमी होते.

माऊथवॉश म्हणून उपयोग

माऊथवॉश म्हणून तुरटी अत्यंत उपयोगी आहे. रोज जर तुम्ही तुरटीचा माऊथवॉश म्हणून उपयोग केला तर तुम्हाला तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका तर मिळेलच. त्याशिवाय तुमच्या दातांचे आरोग्यही चांगले राहील. विशेषतः मुलांच्या ओरल हेल्थसाठी तुरटी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावते. मुलांना लहानपणापासूनच तुरटीच्या वापराची सवय लावल्यास, दातांच्या समस्याही उद्भवत नाहीत.

मांसपेशींसाठी

तुरटी चे फायदे इतकेच नाहीत. तर तुम्हाला मांसपेशी आखडण्याचा त्रास असेल तर त्यासाठीही याचा उपयोग करून घेता येतो. पोटॅशियम अलम जर तुमच्या मांसपेशी आकुंचन पावल्या असतील तर त्या बऱ्या करण्यासाठी उपयोगी ठरते. त्यामुळे जर तुम्हाला असा त्रास असेल तर तुरटीचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता..

ताप, खोकला आणि दमा

शहरांमध्ये ताप, खोकला आणि दमा यासारख्या समस्या आता खूपच कॉमन झाल्या आहेत. यासाठी तुम्ही तुरटीचा उपयोग करा. तुरटीच्या वापराने अलर्जीने आलेला तापही निघून जाण्यास मदत होते. तसेच खोकल्यासाठीही तुम्ही याचा उपयोग करू शकता. तुरटीचे पाणी तुम्ही पिऊन खोकला आणि दम्यावर उपाय करू शकता. तुम्ही 10 ग्रॅम तुरटी आणि 10 ग्रॅम साखर एकत्र वाटून त्याचे चूर्ण करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी एक कप गरम दुधातून हे चूर्ण घालून प्या. त्यामुळे ताप, खोकला आणि दमा निघून जाईल.

युरिनरी इन्फेक्शन

युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनशी संबंधित समस्यांशी तुरटी दोन हात करू शकते. तुरटीमुळे मुत्राशयमुळे होणाऱ्या रक्तस्रावाला थांबवण्याचे काम करता येते. एखाद्या संक्रमणामुळे झालेला हा त्रास तुरटीमुळे बंद होऊ शकत. रक्तस्राव होणाऱ्या भागावर तुरटी प्रभावीपणे काम करते.

केसांसाठी 

केसांसाठीही तुरटी अत्यंत उपयोगी आहे. केसांमध्ये ऊवा होणं ही शाळेत जाणाऱ्या विदार्थ्यांसाठी तर अगदी सामान्य समस्या आहे. ऊवा या लहान मुलांना जास्त प्रमाणात होतात. इतकंच नाही तर ऊवा एकाच्या केसातून दुसऱ्यांच्या केसांमध्ये पटकन जातात. यामुळे खाज आणि स्काल्प अशा समस्या उद्भवतात. पण यापासून सुटका मिळवण्यासाठी तुरटीचा उपयोग करा. तुरटीची पेस्ट तुम्ही केसांना लावली आणि नंतर केस धुतले तर तुम्हाला केसातून ऊवा काढण्यासाठी मदत मिळते. तुरटीमुळे केसातील ऊवा मरून तुमचे केस पुन्हा पहिल्यासारखे ऊवामुक्त होऊ शकतात. त्यामुळे इतर कोणत्याही तेलांचा वापर करण्यापेक्षा तुरटीचा वापर करा.

जखम भरण्यासाठी 

शरीरावर एखादा घाव अथवा जखम झाली तर तुम्ही त्यावर तुरटीचा उपयोग करून घेऊ शकता. यामध्ये अस्ट्रिन्जन्ट आणि हेमोस्टेटिक गुण असल्याने जखम लवकर बरी करण्यास मदत मिळते. शरीरावर कोणतेही घाव, कापले असेल अथवा तोंड आले असेल तर लवकर भरण्याचं काम तुरटी करते. एका ग्लासात गरम पाणी घेऊन त्यात एक चमचा तुरटी पावडर मिक्स करा आणि कोमट झाल्यावर हे पाणी घेऊन जखम धुवा. असं दिवसातून दोन ते तीन वेळा केल्यास घाव वा जखम लवकर भरेल.

पिंपल्सना ठेवते दूर

तुम्हाला सतत पिंपल्स येत असतील आणि सर्व उपाय करूनही पिंपल्स जात नसतील तर तुमच्यासाठी तुरटी गुणकारी ठरू शकते. तुरटीमध्ये अस्ट्रिन्जन्ट गुण आढळतात. ज्यामुळे पिंपल्स बरे करण्यासाठी त्याचा फायदा होतो. तुरटीची पेस्ट करून तुम्ही पिंपल्स आलेल्या ठिकाणी लावा आणि काही वेळाने थंड पाण्याने स्वच्छ धुवा. तुम्हाला याचा लवकरच योग्य परिणाम दिसून येईल.

सुरकुत्या आणि एजिंग

तुरटीचा उपयोग बऱ्याच सौंदर्य प्रसाधनांमध्ये करण्यात येतो. यामध्ये असलेले गुणधर्म त्वचेमध्ये अधिक टाईटनेस आणण्याचे काम करतात. त्यामुळे चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या आणि एजिंग पासून वाचण्यासाठी तुरटी प्रभावी आहे. तुम्ही याचा नियमित वापर केल्यास, हे एखाद्या अँटिएजिंगप्रमाणे काम करते. चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा आणि त्यावर तुरटीचा तुकडा पूर्ण फिरवा.

त्चचा उजळवण्यासाठी

तुरटीमध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे त्चचेमधून साचलेली घाण काढून टाकण्यास मदत मिळते. तसंच त्वचा टोन करण्यासाठीही याचा उपयोग होतो. म्हणून त्वचा उजळवण्यासाठी तुरटीचा उपयोग करण्यात येतो. चेहऱ्यावर पाणी मारून तुरटी नियमितपणे रोज चेहऱ्यावर फिरवावी. त्वचा उजळण्यास मदत मिळते.

फाटलेल्या पायांसाठी

पाय फाटण्याची समस्या बऱ्याच जणांना असते. पण त्यावर उपाय नक्की काय करायचा. तर त्यावर तुरटी हा सोपा उपाय आहे. तुम्ही नियमितपणे तुरटीचा तुकडा पाय ओले करून त्यावर घासला तर तुमची ही समस्या लवकरच बरी होईल. तसंच तुम्हाला त्रासही होणार नाही.

तुरटीचा वापर कसा करावा 

तुरटीचा वापर कशासाठी करावा हे आम्ही तुम्हाला सांगितले. पण याचा वापर नक्की कसा करावा हेदेखील कळायला हवे.

तुरटीचा वापर कसा करावा 

जखम झाली असल्यास ती जखम तुरटीच्या पाण्याने दिवसातून दोन ते तीन वेळा धुतली तर त्याचा परिणाम लवकर होतोपाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटी त्यातून फिरवावी. त्वचेला दुर्गंधी येत असेल तर पाण्यातून तुरटी फिरवून त्या पाण्याने आंघोळ करावी अथवा गरम पाण्यात तुरटीची पावडर मिक्स करावी. दातांची समस्या असेल तर तुरटीच्या पाण्याने रोज चूळ भरावी. चेहऱ्यावर मुरूमं असतील तर तुम्ही चेहरा ओला करून त्यावर रोज तुरटीचा तुकडा फिरवावा यामुळे मुरूमं जाण्यास मदत होते

खोकल्यासाठीही याचा उपयोग होतो पण त्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ऊवा घालवण्यासाठी तुरटीच्या पावडरमध्ये थोडे पाणी मिक्स करून पेस्ट करून घ्या आणि ही पेस्ट केसांना स्काल्पपासून लावा. ऊवा मरततात. मांसपेशींचा त्रास असल्यास, हळद आणि तुरटी पावडर मिक्स करून आखडलेल्या ठिकाणी लावा. त्यामुळे मांसपेशींचा त्रास कमी होतो. शेव्ह केल्यानंतर तुरटीचा खडा फिरवा यामुळे घाव झाला तर त्यात पस होण्याची शक्यता कमी होते. चेहरा नेहमी उजळ दिसण्यासाठी तुरटीचा खडा चेहऱ्यावरून फिरवा

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

5 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

5 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

5 तास ago

खड्ड्यांनी वेढला पाबळ–कन्हेरसर रस्ता; जीव धोक्यात घालून करावा लागतो प्रवास

पावसामुळे खड्ड्यांत साचले पाणी; वाहनचालक त्रस्त, तातडीच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी पाबळ (सुनिल जिते): पाबळ–कन्हेरसर हा…

5 तास ago

शिरूर! करडे गोळीबार प्रकरणातील पाच आरोपी ७२ तासांत जेरबंद; पाहा नावे…

शिरूर (तेजस फडके) : करडे (ता. शिरुर) येथे जुन्या वादातून सराईत गुन्हेगारावर पिस्तुलातून तीन राउंड…

7 तास ago

अळीवचे आरोग्यदायी फायदे

अळीवमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. महिलांना मासिक पाळीच्या काळात किंवा…

9 तास ago