महाराष्ट्र

दुष्काळात पशुधनाला चाऱ्याचा आधार! ‘व्हीबी जी राम जी’ योजनेंतर्गत चारा लागवडीला प्रोत्साहन

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधनासाठी निर्माण होणारी चारा टंचाई दूर करण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत ‘विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण)’ अर्थात ‘व्हीबी जी राम जी’ योजनेंतर्गत चारा पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यासाठी सात प्रकारच्या अतिरिक्त चारा पिकांचा योजनेत समावेश करण्यात आला असून, वैयक्तिक शेतकऱ्यांच्या शेतावर तसेच सार्वजनिक आणि सामुदायिक जमिनीवर चारा लागवड करता येणार आहे. रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी ही माहिती दिली.

सन २०२६ मध्ये पावसातील तूट, पावसाचे असमान वितरण, खरीप पिकांच्या उत्पादनात झालेली घट आणि आगामी रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्रात संभाव्य घट यामुळे पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कमी होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन चारा उत्पादन वाढविण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. मंत्रालयात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना मंत्री गोगावले यांनी या निर्णयाची माहिती दिली.

चारा लागवडीसाठी कमी पाण्यात येणारी, कमी कालावधीत उत्पादन देणारी आणि एकापेक्षा अधिक वेळा कापणी करता येणाऱ्या पिकांच्या वाणांना प्राधान्य दिले जाणार आहे. स्थानिक हवामान, जमिनीचा प्रकार, सिंचनाची शाश्वत उपलब्धता आणि पीक कालावधी यांचा विचार करून पशुसंवर्धन विभागाच्या जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी योग्य वाणांची शिफारस करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सात प्रकारच्या चारा पिकांना मान्यता 

या योजनेंतर्गत मका, ज्वारी, बाजरी, नेपियर गवत, लसूणघास (ल्युसर्न), ज्वारी मल्टीकट आणि बाजरी मल्टीकट या सात चारा पिकांचा समावेश करण्यात आला आहे. या पिकांच्या विविध सुधारित वाणांची लागवड करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वीच्या शासन निर्णयातील चारा पिके आणि वैरणयुक्त वृक्षांच्या लागवडीसोबत आता या अतिरिक्त पिकांची लागवडही करता येणार आहे.

वैयक्तिक शेतकरी आणि सामुदायिक जमिनींनाही लाभ

‘व्हीबी जी राम जी’ योजनेंतर्गत अनुज्ञेय ३७५ कामांमधील ‘उपजीविकेशी संबंधित पायाभूत सुविधा’ या वर्गात सामुदायिक उपयोगासाठी चारा लागवड आणि वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी चारा लागवड अशा दोन कामांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे वैयक्तिक शेतकरी तसेच सार्वजनिक आणि सामुदायिक जमिनीवर चारा उत्पादनाची कामे हाती घेता येणार आहेत.

चारा लागवडीसाठी आवश्यक बियाणे महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ, कृभको, भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) आणि कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) यांसारख्या संस्थांकडून उपलब्ध करून घेता येणार आहे.

कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना प्राधान्य

चारा लागवडीसाठी कमी पाण्यात येणारी, कमी कालावधीत उत्पादन देणारी आणि एकापेक्षा अधिक वेळा कापणी करता येणाऱ्या पिकांच्या वाणांना प्राधान्य दिले जाणार आहे. स्थानिक हवामान, जमिनीचा प्रकार, सिंचनाची शाश्वत उपलब्धता आणि पीक कालावधी यांचा विचार करून पशुसंवर्धन विभागाच्या जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी योग्य वाणांची शिफारस करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पशुसंवर्धन, कृषी विभाग आणि ग्रामपंचायतींकडे अंमलबजावणी

या योजनेची अंमलबजावणी पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग आणि ग्रामपंचायतींच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. संबंधित विभागांच्या निश्चित केलेल्या अधिकाऱ्यांना कामांसाठी तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

रोजगार हमी योजनेत मजुरांच्या श्रमांना प्राधान्य असल्याने मजुरांमार्फत करता येणाऱ्या कामांसाठी यंत्रसामग्रीचा वापर करता येणार नाही. तसेच, एकदा चारा लागवडीचे काम घेतलेल्या क्षेत्रावर त्याच योजनेतून पुन्हा चारा लागवडीचे काम करता येणार नाही.

लाभार्थ्यांची निवड, कामांचे नियोजन, सामाजिक अंकेक्षण आणि योजनेतील निर्धारित आर्थिक मर्यादांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. चारा लागवडीच्या कामांवर संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी देखरेख ठेवली जाणार आहे.

दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा उपलब्धता वाढविण्यासोबतच ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीलाही चालना मिळणार आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून चारा उत्पादनाला प्रोत्साहन मिळाल्यास शेतकरी आणि पशुपालकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मनात विचारांचं काहूर, सतत चिडचिड होते? तुम्हालाही स्ट्रेस छळतोय ना, वाचा ४ सोपे उपाय

आपले मन आणि शरीर निरोगी असणं फार गरजेचे आहे. शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य जपायला हवे.…

58 मिनिटे ago

पाणी पिण्याची योग्य पद्धत

पाणी हे संपूर्ण आहारातील अतिशय महत्त्वाचा घटक असतो. शरीराचा ७० टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला…

1 तास ago

थापाडे कोण, हे महाराष्ट्राला ठाऊक! एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

अमित शाह यांच्यावरील टीकेला शिंदेंचे प्रत्युत्तर; शेतकरी प्रश्नांवरूनही विरोधकांना सुनावले मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह…

1 तास ago

सात दशकांच्या अभिनय प्रवासातील आठवणींना उजाळा; ‘चित्रपताका’मध्ये ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटेंच्या गप्पांनी रंगली मैफल!

‘क्वीन ऑफ द कॉमेडी... गप्पा शुभा खोटेंशी!’ या विशेष मुलाखतीत उलगडला हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळ; मेहमूद,…

1 तास ago

वोटचोरीच्या मुद्द्यावर निवडणूक आयोगाला घुमजाव करावे लागले

राहुल गांधींच्या आंदोलनाचा परिणाम; आशिष शेलारांनी आधी माहिती घ्यावी, ॲड. संदेश कोंडविलकरांचा पलटवार मुंबई: लोकसभेतील…

1 तास ago

मराठी सिनेमाची ५०० कोटींच्या व्यवसायाची क्षमता; ग्रामीण महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करा

प्रवीण तरडे यांचा ‘चित्रपताका’तील परिसंवादात विश्वास; मराठी चित्रपटांच्या मार्केटिंग, निर्मिती आणि प्रेक्षकांशी तुटलेल्या नात्यावर मंथन…

2 तास ago