आरोग्य

चेहरा चमकदार करण्यासाठी बटाट्याच्या सालीचा कसा वापर करावा? जाणून घ्या पद्धत…

सामान्यपणे जास्तीत जास्त लोक बटाट्याची साल फेकून देतात. कारण अनेकांना याचे फायदे माहीत नसतात. बटाट्याच्या सालीने त्वचेसाठी खूप फायदे असतात. यात भरपूर अ‍ॅंटी ऑक्सिडेंट्स, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स असतात. जर तुम्ही बटाट्याच्या सालीचा योग्यपणे वापर केला तर ते तुमच्या त्वचेसाठी वरदान ठरू शकतात. अशात आज आम्ही तुम्हाला बटाट्याच्या सालीचा त्वचेसाठी कसा वापर करावा हे सांगणार आहोत.

चेहरा चमकदार करण्यासाठी बटाट्याची साल

१) बटाट्याची साल आणि मध

मध हे एक नॅचरल मॉइश्चरायजर आहे. जे त्वचेला मुलायमपणा देतं. बटाट्याची साल बारीक करून ते मधात मिक्स करा आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. १५-२० मिनिटांनी चेहरा धुवून घ्या. याने त्वचा उजळेल आणि चमकदार दिसेल. तसेच त्वचेवरील डागही कमी होतील.

२) बटाट्याची साल आणि दही

दह्यामध्ये लॅक्टिक अ‍ॅसिड असतं. जे त्वचेवरील मृत पेशी दूर करण्यास मदत करतं. बटाट्याची सालीची पेस्ट दह्यात मिक्स करून चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटे हे असंच ठेवा नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. याने त्वचा चमकदार होईल.

३) बटाट्याची साल आणि हळद

हळदीमध्ये अ‍ॅंटी बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी इन्फ्लेमेटरी गुण असतात. जे त्वचेच्या समस्या दूर करण्यास मदत करतात. बटाट्याची सालीची पेस्ट हळदीमध्ये मिक्स करून चेहऱ्यावर लावा. १०-१५ मिनिटांनंतर चेहरा धुवून घ्या. त्वचेवर उजळपणा दिसेल.

४) बटाट्याची साल आणि गुलाबजल

गुलाबजल हे त्वचेसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. अशात गुलाबजल आणि बटाट्याची साल मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास अधिक फायदा मिळतो. याने त्वचा उजळते आणि त्वचेला थंडावाही मिळतो.

५) बटाट्याची साल आणि लिंबाचा रस

लिंबाचा रस त्वचेला ब्लीच करण्यास मदत करतो आणि यामुळे त्वचा उजळते. बटाट्याच्या सालीची पेस्ट बनवा आणि त्यात थोडा लिंबाचा रस टाका. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. १०-१५ मिनिटांनी चेहरा धुवून घ्या. याने त्वचेचा टोन सुधारेल आणि काळे डागही दूर होतील.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

11 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

11 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

11 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

11 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

11 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

11 तास ago