आरोग्य

तुमच्यासाठी तुमचा आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस चांगला आहे. शुभलाभ असून अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. घरात आणि ऑफिसमध्ये तुम्हाला बदल जाणवेल जो तुमच्यासाठी सकारात्मक असेल. आज जे काही काम कराल त्यात फोकस ठेवा. सर्तक आणि सावध राहून काम करा, ज्यामुळे तुमचा आत्मसन्मान वाढेल. रागावर नियंत्रण ठेवा.आर्थिक स्थिती उत्तम आहे तसेच व्यवसायात नवे प्रोजेक्ट मिळणार आहेत

वृषभ: आजचा दिवस अतिशय उत्तम असून मान-सन्मान वाढणार आहे तसेच धनसंपत्ती मिळण्याचे योग आहेत. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला मिळतील. व्यवसायात नवीन सहकारी मिळतील, ज्याचा तुम्हाला भविष्यात खूप लाभ होईल. घरी आर्थिक स्थिती चांगली राहील. गरज असेल तरच खर्च करा. बचत करण्याची सवय चांगली हे लक्षात ठेवा आणि गुंतवणुकीसाठी दिवस उत्तम आहे.

मिथुन: आजचा दिवस उत्तम असून प्रत्येक कामात नशिबाची साथ आहे. धनलाभाचा योग आणि व्यवसायात नफा आहे. नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित अनेक मुद्दे सोडवता येऊ शकतात. घरचा सदस्य पैशांची मागणी करू शकतो. त्यांना मदत करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. यामुळे तुम्हाला लाभ होईल. सहकार्याची भावना ठेवणे उत्तम आहे. संध्याकाळची वेळ कुटुंबासोबत व्यतीत करणार आहात.

कर्क: आजचा दिवस ठिक आहे. तुम्हाला मुलांकडून चांगली बातमी मिळणार आहे. कुटुंबात आनंदी आणि समाधानी वातावरण असेल. खूप दिवस अडकून पडलेले काम पूर्ण होणार आहे. आज धनसंपत्ती मिळण्याचा योग आहे पण त्याचबरोबर खर्च होणार आहे. व्यवसायात स्थिती चांगली आहे फोकस राहून काम करा, विरोधक त्रास देतील पण दुर्लक्ष करा.

सिंह: आजचा दिवस भाग्यवृद्धीचा आहे. ऑफिसमध्ये तुमची बदली होणार आहे जी तुमच्याासाठी सकारात्मक ठरेल. व्यापार- व्यवसायात तुमची वाणी मधुर ठेवा म्हणजे कठिण कामे सोपे होतील. धनलाभ आहे तसेच आर्थिक स्थिती उत्तम राहणार आहे. अनोळखी व्यक्तीसोबत व्यवहार करु नका. मोठा प्रोजेक्ट मिळणार असून उत्तम लाभ होणार आहे.

कन्या: आज दिवस उत्तम असून तुमची भाग्य वृद्धी होणार आहे. ऑफिसमधील बदल तुमच्यासाठी सकारात्मक असणार आहेत. व्यापार चांगला राहणार आहे फक्त तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा. कोणावर रागावू नका. नोकरी करणाऱ्यांनी कामावर फोकस ठेवा, वादविवादापासून दूर राहा. विरोधक काही बोलले तर त्यांना शब्दातून उत्तर देण्यापेक्षा कामातून उत्तर द्या.

तूळ: नोकरी असो वा व्यवसाय तुमचा थोडा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. कोणताही निर्णय घेताना अडचण जाणवेल. व्यवसायात वेग कमी असेल त्यामुळे टेन्शन येण्याची शक्यता आहे पण घाबरू नका. योग्य वेळेची वाट पाहा. आर्थिक स्थिती सांभाळण्यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च जास्त होऊ शकतो..

वृश्चिक: आजचा दिवस महत्त्वाचा आहे तुम्ही स्वतःला वेळ देणार आहात. आत्मविश्लेषण करा त्यामुळे भविष्यातील योजना उत्तम प्रकारे तयार होतील. जर उच्च पदावर अधिकारी असाल, तर मोठी जबाबदारी मिळू शकते. सरकारी कामे मार्गी लागणार. व्यापारी वर्गासाठी सरकारी करार किंवा परवान्याशी संबंधित कामात प्रगती असेल. आर्थिक स्थितीत सुधारणा असून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे लाभदायक आहे.

धनु: धनलाभाचे अनपेक्षित स्रोत निर्माण होऊ शकतात. तुम्ही भूतकाळात काळात केलेली गुंतवणूक आता चांगला नफा देईल. जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा किंवा मुलाखतीची तयारी करत असाल, तर यश मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गाला जुने अडकलेले पैसे मिळू शकतात. नवीन संपर्क होणार आणि त्याचा मोठा फायदा भविष्यात होईल. करिअरमध्ये मोठी संधी मिळू शकते.

मकर: खासकरून जर तुम्ही एखाद्या टीमचे नेतृत्व करत असाल, नोकरीमध्ये बॉससोबत एखाद्या मुद्द्यावरून वाद होण्याची शक्यता आहे. यावेळेत शब्दांचा वापर जरा जपूनच करा. व्यवसायात डिल फायनल होवू शकते. आर्थिकदृष्ट्या खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. पाहुणे येणार आहेत आणि त्यामुळे बजेट बिघडू शकते. धार्मिक किंवा परोपकारी कार्यांसाठी आर्थिक खर्च होण्याची शक्यता आहे.

कुंभ: नोकरी असो वा व्यवसाय प्रगतीचे मार्ग खुले होतील. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू इच्छित असाल, तर योजना बनवायला सुरुवात करा. तंत्रज्ञान, कन्सल्टिंग, शिक्षण, रिटेल क्षेत्रातील लोकांना विशेष फायदा होईल. मिळकतीचे नवे मार्ग खुले होत आहेत. कामाच्या ठिकाणी मानसन्मान आणि सहकार्य मिळेल. रिलोकशनचे प्लॅनिंग करत असाल तर वेळ उत्तम आहे.

मीन: तुमची जुनी अपूर्ण कामे पूर्ण करण्यात यशस्वी होणार आहात. नोकरी करणाऱ्या लोकांना बदली किंवा नवीन पोस्टिंगचे संकेत मिळू शकतात, जे फायदेशीर ठरतील. व्यापारी वर्गासाठी जुना स्टॉक विकून टाकण्याची वेळ आहे, नफा थोडा कमी होऊ शकतो, पण रोख रक्कम हाती येईल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. आर्थिकदृष्ट्या खर्च असूनही समतोल कायम ठेवाल. नवीन गुंतवणूक किंवा विमा योजनेचा विचार करा.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

10 तास ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

10 तास ago

संतुलित आरोग्यासाठी मेडिटेशन करण्याचे फायदे

आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी अनेकदा डॉक्टर मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात. मेडिटेशन हे केवळ मानसिक नव्हे तर…

14 तास ago

जिमला जायला वेळ नाही? बेली फॅट कमी करण्यासाठी फॉलो करा या सोप्या गोष्टी

पोटावर वाढलेली चरबी आपला पूर्ण लूक खराब करू शकते. हट्टी बेली फॅट कमी करण्यासाठी बऱ्याच…

14 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी शिवसेनेचा मदतीचा हात; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा…

14 तास ago

‘व्होट चोरी’च्या आरोपांवर संजय निरुपमांचा पलटवार; ‘पराभवानंतर निवडणूक आयोगाला लक्ष्य करणे योग्य नाही’

मुंबई: निवडणूक आयोग आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना…

14 तास ago