शिरूर तालुका

शिरूर पोलिसांकडून गुटखा तस्करीवर धडक कारवाई; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील रिलायन्स जिओ पंप परिसरात गुटखा विक्रीसाठी आलेल्या युवकावर शिरूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अरबाज हमीद शेख (वय १९, रा. मोठी मशीद समोर, सुपा, ता. पारनेर, जि. अहमदनगर) याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

शिरूर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, एक इसम MH-16-DG-5597 क्रमांकाच्या लाल रंगाच्या स्विफ्ट कारमधून गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ घेऊन जिओ पेट्रोल पंप परिसरात येणार आहे. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक केंजळे यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांना तत्काळ कारवाईचे आदेश दिले.

त्यानुसार पथकाने तत्काळ सापळा रचत स्विफ्ट गाडीची झडती घेतली असता, गोवा 1000 पान मसाला व अन्य तंबाखूजन्य पदार्थ असा ५२,५०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा सापडला, तसेच वाहतुकीसाठी वापरलेली सुमारे ५ लाख रुपये किंमतीची कार जप्त करण्यात आली. एकूण कारवाईत ५ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी अरबाज शेख याच्याविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने २५ जुलै २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत.शिरूर शहरात तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या धडक मोहिमेला ही कारवाई मोठे यश ठरत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणातील वाळूमाफियांचे इंस्टाग्राम स्टेटसद्वारे प्रशासनाला खुले आव्हान; पुणे जिल्हाधिकाऱ्यांसह शिरूरच्या यंत्रणेचे नेमके चाललेय तरी काय?

शिरूर (तेजस फडके) : शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जीवनदायिनी ठरलेल्या घोड धरणातील वाळू उपशाचा…

8 तास ago

शिरुर तालुक्यात किरकोळ कारणांवरुन मारहाणीच्या दोन वेगवेगळ्या घटना; १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात किरकोळ कारणांवरुन झालेल्या वादाचे रुपांतर थेट मारहाणीत होत असल्याच्या दोन…

11 तास ago

शिक्रापूर पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी झाली दूर…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : दिवाळी म्हटले की खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी आणि नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक…

6 दिवस ago

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

1 आठवडा ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

1 आठवडा ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

1 आठवडा ago