आरोग्य

ऑफिसात खुर्चीवर बसून मान-पाठ-कंबर दुखते या ५ सोप्या गोष्टी करा

आपल्यापैकी बरेचजण ऑफिसमध्ये बैठे काम करतात. बैठे काम म्हटलं की तासंतास खुर्चीवर एकाच जागी बसून काम करणे आले. दिवसभरातील काही तास सलग एकाच जागी बसून शरीराची हालचाल न करता काम केल्यास त्याचा त्रास होतो. ऑफिसमध्ये एकाच जागी खुर्चीवर बसून राहिल्याने पाठ आणि पाठीच्या खालच्या भागात वेदना होणे यांसारख्या समस्या सतावतात. खुर्चीवर चुकीची बसण्याची पद्धत, हालचालींचा अभाव, आणि कामाचा ताण यामुळे ही समस्या अधिक तीव्र होऊ शकते. खुर्चीवर तासंतास बसून काम केल्याने मान, पाठ, कंबर आणि पाय यांसारख्या अवयवांची दुखणी कायमची मागे लागतात. दिवसभर खुर्चीत बसून राहिल्याने अनेकदा आपले स्नायू आखडतात, दुखू लागतात, कंबर व पायात लचक भरल्यासारखे वाटू लागते.

या समस्या सुरुवातील फारच किरकोळ वाटतात परंतु वेळीच याकडे लक्ष दिले नाही तर त्याचे रूपांतर गंभीर समस्येत देखील होऊ शकते. ऑफिसमध्ये काम करताना दिवसभर एकाच जागी खुर्चीत बसून राहिल्याने आरोग्याच्या अनेक तक्रारी डोकं वर काढतात. मान, पाठ, कंबर आणि पाय यांसारख्या अवयवांवर कायमचा परिणाम होऊ शकतो. असे होऊ नये यासाठी, ऑफिसमध्ये काम करताना दिवसभर एकाच जागी खुर्चीवर बसून राहण्यापेक्षा आपण काही साध्यासोप्या टिप्स फॉलो करु शकतो, ज्यामुळे आपल्याला या समस्यांपासून मोठ्या प्रमाणात आराम मिळू शकतो.

ऑफिसमध्ये सतत खुर्चीवर एकाच जागी बसून राहू नका… 

१) खुर्चीत बसण्याची योग्य पद्धत: खुर्चीत चुकीच्या पद्धतीने बसणे हे पाठीच्या दुखण्याचे सर्वात मोठे कारण ठरु शकते. त्यामुळे खुर्चीवर नेहमी सरळ बसा आणि पाठीचा खालचा भाग खुर्चीच्या पाठीमागील आधाराला टेकवून मगच बसा. खांदे सैल ठेवावेत आणि दोन्ही पाय जमिनीवर सरळ व सपाट पद्धतीने ठेवावेत. जर पाय जमिनीला लागत नसतील तर फुटरेस्टचा वापर करा. तुमचा कॉम्प्युटर मॉनिटर डोळ्यांच्या समोर अगदी समान पातळीवर असावा, जेणेकरून मान पुढे झुकवण्याची गरज भासणार नाही. खुर्चीत बसताना आपले बॉडी पोश्चर योग्य पद्धतीने आहे का ते तपासून बघा.

२) तासाला घ्या छोटा ब्रेक: ऑफिसमध्ये दिवसभर सलग खुर्चीवर बसणे आपल्या पाठीसाठी अतिशय हानिकारक ठरू शकते. त्यामुळे दर ४५ ते ६० मिनिटांनी खुर्चीवरून उठून ५ ते १० मिनिटांचा छोटा ब्रेक घ्या. या दरम्यान तुम्ही थोडं चालू शकता, पाणी पिऊ शकता किंवा हलक्याफुलक्या स्ट्रेचिंग एक्सरसाइज करू शकता. यामुळे पाठीच्या आणि इतर स्नायूंना आराम मिळेल आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होईल.

३) हलकी स्ट्रेचिंग एक्सरसाइज करा: तुमच्या ऑफिस डेस्कवर बसूनसुद्धा तुम्ही काही सोप्या स्ट्रेचिंग एक्सरसाइज करू शकता. मान, खांदे आणि पाठीच्या खालच्या भागाचे सौम्य स्ट्रेचिंग करणे फायदेशीर ठरते. उदाहरणार्थ, दोन्ही हात वर उचलून पाठीला सौम्यपणे मागे झुकवा किंवा मान हळूहळू एका बाजूने दुसऱ्या बाजूला वळवा. अशा स्ट्रेचिंगमुळे स्नायूं आखडले असल्यास ही समस्या कमी होण्यास मदत होते सोबतच वेदना देखील कमी होतात.

4) पुरेसं पाणी प्या: शरीराच्या एकूण आरोग्यासाठी पुरेसं पाणी पिणं महत्त्वाचं आहेच, पण ते आपल्या पाठीच्या आरोग्यासाठीसुद्धा तितकंच आवश्यक आहे. आपल्या मणक्यांमध्ये असलेल्या डिस्क या शॉक अॅब्झॉर्बरचं काम करतात आणि त्यांना निरोगी ठेवण्यासाठी शरीरात पुरेशी आर्द्रता असणं गरजेचं आहे. त्यामुळे दररोज योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास या डिस्क योग्य रीतीने कार्य करू शकतात आणि पाठीच्या वेदना होण्याचा धोका कमी होतो.

५) ऑफिस चेअरची योग्य निवड: जर तुम्ही ऑफिसमध्ये दीर्घकाळ बसून काम करत असाल, तर शरीराच्या ठेवणीला अनुरूप अशी एर्गोनोमिक खुर्ची निवडणं अत्यंत आवश्यक आहे. अशा खुर्च्या तुमच्या पाठीला योग्य आधार देतात आणि शरीराचे योग्य पोश्चर कायम ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे पाठीवर अनावश्यक ताण येत नाही आणि वेदनांचा त्रास कमी होतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

3 तास ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

4 तास ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

19 तास ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

19 तास ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

1 दिवस ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

1 दिवस ago