आरोग्य

रात्री झोपेत तुम्हालाही घाम येत असेल तर ‘या’ गंभीर आजारांचे असू शकतात संकेत

बऱ्याच लोकांना रात्री झोपेत घाम येतो. काहींना तर इतका घाम येतो की, कपडेही भिजतात आणि झोपमोडही होते. जर तुम्हालाही असं होत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. यामागे हार्मोनल बदल किंवा काही गंभीर आजार कारणीभूत असू शकतात. अशात रात्री झोपेत घाम येण्याची कारणे आणि त्यावर काही घरगुती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

रात्री झोपेत घाम का येतो

पहिलं कारण हृदयरोग असू शकत. त्याशिवाय कॅन्सरसारखा जीवघेणा आजारही याचं कारण असू शकतो. जसे की, ब्रेस्ट कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, कार्सिनॉइड ट्यूमर आणि ल्यूकेमिया.

तसेच रात्री झोपेत घाम येणे हा लो ब्लड शुगरचाही संकेत असू शकतो. त्याशिवाय रात्री घाम येणं शरीराचं तापमान वाढण्याचं लक्षण असू शकतं.

महिलांमध्ये मेनोपॉज दरम्यान होणाऱ्या शारीरिक बदलांमुळेही रात्री झोपेत घाम येऊ शकतो. थायरॉईड हेही याचं एक कारण असू शकतं.

प्रेग्नेन्सी दरम्यान हार्मोनचं प्रमाण कमी-जास्त होत असल्यानेही रात्री घाम येऊ शकतो.

काही घरगुती उपाय

जर रात्री तुम्हाला घाम येत असेल तर रात्री भरपूर थंड पाणी प्यावे.

झोपण्याआधी सैल आणि सुती कपडे घाला. जेणेकरून घाम कमी येईल.

रात्री येणारा घाम टाळण्यासाठी दिवसा भरपूर चालावं. सायकलिंग किंवा स्वीमिंगही करू शकता.

रूममधील खिडक्या उघड्या ठेवा. त्याशिवाय सिगारेट पिणं टाळा आणि झोपण्याआधी व्यायाम करा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

1 दिवस ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

2 दिवस ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

2 दिवस ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

2 दिवस ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

2 दिवस ago

मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजप, आपच्या पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश!

राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…

2 दिवस ago