रात्री झोप पूर्ण न झाल्याने दुसऱ्या दिवशी सर्वांनाच थकवा आणि अस्वस्थता जाणवत राहते. जास्त वेळ झोप न घेता राहणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. प्रौढांनी दररोज रात्री सात तासांपेक्षा जास्त झोप घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुरेशी झोप न मिळाल्याने नैराश्य, मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब आणि पक्षाघात, अकाली मृत्यू यांसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
आजारी पडण्याचे प्रमाण वाढतेय
झोपेच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत करते. त्यामुळे आपल्याला आजार होण्याची अधिक शक्यता असते. जसजसे आपण झोपेशिवाय राहतो तसससे आपण वास्तविक जगापासून लांब गेल्याची आणि संभ्रमात राहण्याची शक्यता वाढते.
नेमके काय होते
झोप हा आपल्या दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग आहे. झोप आपल्या शरीरातील अनेक यंत्रणांना आराम करण्यास आणि त्या नीट करण्यास, तसेच होणारे नुकसान टाळण्यासाठी सक्षम करते. झोप न घेतल्याने एकाग्रता कमी होण्याव्यतिरिक्त डोळे सुजणे, काळी वर्तुळे, चिडचिड, स्मरणशक्ती कमी होणे, गोंधळ, लवकर निर्णय घेण्यास अक्षम होणे अशी लक्षणे दिसतात.
रात्रीची शिफ्ट नकोच
या लक्षणांवर मात करण्यासाठी अनेक लोकांना अनेक दिवस किंवा आठवडे लागू शकतात. वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांना अनेकदा झोपेच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. रात्रीच्या शिफ्टमधील कामगार दिवसाच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कामगारांपेक्षा दररोज १ ते ४ तास कमी झोपतात. यामुळे त्यांच्या अकाली मृत्यूचा धोका वाढू शकतो.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…