आरोग्य

७ तास झोप घेत नसाल तर तुम्ही डेंजर झोनमध्ये आहात, अकाली मृत्यू, हार्ट अटॅक, नैराश्य येण्याची भीती

रात्री झोप पूर्ण न झाल्याने दुसऱ्या दिवशी सर्वांनाच थकवा आणि अस्वस्थता जाणवत राहते. जास्त वेळ झोप न घेता राहणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. प्रौढांनी दररोज रात्री सात तासांपेक्षा जास्त झोप घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुरेशी झोप न मिळाल्याने नैराश्य, मधुमेह, लठ्ठपणा, हृदय विकाराचा झटका, उच्च रक्तदाब आणि पक्षाघात, अकाली मृत्यू यांसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

आजारी पडण्याचे प्रमाण वाढतेय

झोपेच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत करते. त्यामुळे आपल्याला आजार होण्याची अधिक शक्यता असते. जसजसे आपण झोपेशिवाय राहतो तसससे आपण वास्तविक जगापासून लांब गेल्याची आणि संभ्रमात राहण्याची शक्यता वाढते. १९८६ मध्ये ४५३ तास म्हणजे सुमारे १९ दिवस झोप न काढणाऱ्या रॉबर्ट मॅकडोनाल्डच्या नावावर गिनीज बुकमध्ये या विश्वविक्रमाची नोंद आहे.

नेमके काय होते

झोप हा आपल्या दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग आहे. झोप आपल्या शरीरातील अनेक यंत्रणांना आराम करण्यास आणि त्या नीट करण्यास, तसेच होणारे नुकसान टाळण्यासाठी सक्षम करते. झोप न घेतल्याने एकाग्रता कमी होण्याव्यतिरिक्त डोळे सुजणे, काळी वर्तुळे, चिडचिड, स्मरणशक्ती कमी होणे, गोंधळ, लवकर निर्णय घेण्यास अक्षम होणे अशी लक्षणे दिसतात.

रात्रीची शिफ्ट नकोच

या लक्षणांवर मात करण्यासाठी अनेक लोकांना अनेक दिवस किंवा आठवडे लागू शकतात. वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांना अनेकदा झोपेच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. रात्रीच्या शिफ्टमधील कामगार दिवसाच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कामगारांपेक्षा दररोज १-४ तास कमी झोपतात. यामुळे त्यांच्या अकाली मृत्यूचा धोका वाढू शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

8 तास ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

9 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

9 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

9 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

9 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

9 तास ago