आरोग्य

सारखं डोकं दुखत, डोक जड होण्याची कारणं आणि डोकेदुखी थांबण्याचे उपाय

डोकेदुखीचा त्रास अनेकांना सतत सतावत असतो. त्यातून त्वरित आराम मिळण्यासाठी औषधे घेण्याऐवजी साधे घरगुती उपाय करणे जास्त फायद्याचे ठरते. अनेक कारणांमुळे डोकं दुखतं. पित्ताचा त्रास असेल किंवा झोपेचा अभाव डोकं लगेच दुखायला लागत. आजकाल मोबाइल, लॅपटॉप पाहण्याचे प्रमाण खुप जास्त आहे त्यामुळे डोळ्यांना त्रास होतो आणि डोकही दुखत. काही साधे उपाय आहेत जे केल्याने डोकं दुखायच थांबेल.

१) कोमट पाण्यात अर्धा लिंब पिळायचा. असे पाणी दिवसातून दोन ते तीन वेळा प्या. पचनासाठी मदत होते आणि अपचनामुळे जर डोकं दुखत असेल तर आराम मिळतो. पोटातील गॅस कमी होतो आणि काही वेळातच डोकेदुख थांबते.

२) पेपरमिंट ऑइल डोकेदुखीवर अगदी प्रभावी असते. पेपरमिंटमधील मेन्थॉलमुळे रक्तवाहिन्या खुल्या होतात आणि थंडावा मिळतो. डोक्याला तेलाने चंपी करायची म्हणजे डोकं दुखणं थांबेल.

3) आलं आणि मध गरम पाण्यात घालायचे आणि प्यायचे. आल्याचे पाणी फार फायद्याचे ठरेल. तसेच आल्याचा किंवा सुंठीचा चहाही उपयुक्त ठरतो.

४) लवंग गरम करून रुमालात बांधून त्याचा वास घेणे किंवा तेलात लवंग गरम करुन त्या तेलाचा लेप कपाळावर लावल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो. हा घरगुती उपाय वर्षानुवर्षे चालत आला आहे.

५) शरीरातील कॅफेनचे प्रमाण जास्त झाल्यावरही डोकं दुखतं. त्यामुळे शरीरातील कॅफेनचे प्रमाण योग्य राहील एवढेच खावे. संतुलित ठेवा.

६) महिला अनेकदा केस धुतल्यावर ओले केस बांधतात. ओले केस बांधल्यामुळे डोकं प्रचंड दुखतं आणि केसांना वासही घाण येतो. त्यामुळे ओले केस अजिबात बांधू नका. पोकळीत केस व्यवस्थित वाळले की मग केस बांधायचे.

७) डिहायड्रेशनमुळे डोकं दुखतं. त्यामुळे दिवसभरात शरीराला जेवढे गरजेचे आहे तेवढे पाणी पिणे फार महत्त्वाचे असते. पाण्यात तुळस घालायची आणि तुळस पाणी प्यायचे. जास्त फायद्याचे ठरेल.

८) झोपेचे प्रमाण कमी जास्त झाल्यावर दिवसभर डोकं जड होतं. अति झोप चांगली नाही आणि अभावही. त्यामुळे झोप संतुलित असावी. लवकर झोपायचे आणि वेळेत उठायचे. असे केल्याने डोकेदुखीचे प्रमाण कमी होईल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago