मुख्य बातम्या

रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त तालुकास्तरीय आदर्श शिक्षिक पुरस्कार २०२५ वितरण

शिरूर (किरण शेलार पिंगळे): रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त तालुकास्तरीय आदर्श शिक्षिका पूरस्कार २०२५ वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. शिक्षकांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यातील योगदान तसेच समाजकार्यातील सहभाग अधोरेखित करत गेली नऊ वर्षे हे पुरस्कार दिले जात असल्याचे संस्थेने स्पष्ट केले.

शिरूर पोलिस स्टेशनचे पी.एल. संदेश केंजळे साहेब यांनी शिक्षकांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. अ‍ॅड. सुभाष पवार (शहर विकास आघाडी), कल्याण कोकाटे सर यांनी मनोगते व्यक्त केली. तर शिरूर गटशिक्षण अधिकारी श्री. बाळकृष्ण कळमकर साहेब यांनी शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित करत पुरस्कार प्राप्तांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांना आदर्श गटशिक्षण अधिकारी पुरस्कार प्रदान करून विशेष गौरविण्यात आले. शिरूर हवेलीचे आमदार मा. कार्यसम्राट श्री. अशोक बापू पवार यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा देऊन सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमात अनेक मुख्याध्यापक व शिक्षकांना ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन आदर्श शिक्षिक पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पी.एल. संदेश केंजळे, पंचायत समितीचे धोत्रे साहेब, अ‍ॅड. सुभाष पवार, श्री. संजय शितोळे (शितोळे करिअर अकॅडमी), श्री. यशवंत कर्डिले (उपसरपंच, शिरूर ग्रामीण), श्री. शामकांत वर्पे, अ‍ॅड. रविंद्र खांडरे, श्री. संतोष शिंदे (सरपंच, अण्णापूर), शंकर रासकर, केशव शिंदे (अण्णापूर ग्रा.सदस्य), पैलवान अशोक पवार, श्री. संतोष थेऊरकर (युवा उद्योजक), साधना शितोळे, शर्मिला निचित, गीता आढाव, शीतल शर्मा, दुर्गा ननवरे, आढाव भाऊ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्षा सौ. राणी कर्डिले यांनी केले. सूत्रसंचालन अर्जुन निचित सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. संतोष थेऊरकर यांनी मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago