आरोग्य

दिवसभरात व्यायामाला वेळ नसेल तर झोपण्यापूर्वी द्या पाच मिनिट, व्हाल निरोगी आणि दीर्घायुषी

मनुष्य मनाने तरुण असला तरी शरीराने लवकर थकतो. त्यामागे कारणं अनेक प्रकारची असू शकतात. शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रासाने अकाली वृद्धत्त्व येतं. केस पिकणे, शरीर थकणे, विविध प्रकारच्या व्याधी होणे यामुळे वय कमी असूनही शरीरावर म्हातारपणाच्या खुणा दिसू लागतात. केस काळे करणे, अँटी एजिंग क्रीम लावणे, फेस मसाज करणे असे नानाविध उपचार केले जातात. हे थांबवायचे असेल तर वेळीच दोन उपचार आज रात्रीपासून सुरु करा.

आयुर्वेदात असे अनेक उपचार आहेत, ज्यामुळे आपण आपले तन-मन निरोगी ठेवू शकतो. यासाठी दर वेळी आयुर्वेदिक औषधंच घेतली पाहिजेत असे नाही. तर आयुर्वेदिक जीवनशैलीचा आपल्या दैनंदिन जीवनात समावेश केलात तरीदेखील तुम्ही कायमस्वरूपी निरोगी जीवन जगू शकता.

आयुर्वेदाचा भर केवळ जडीबुटीवर नाही तर आहार-विहारावर देखील असतो. आयुर्वेदानुसार रात्रीचे जेवण तुम्ही झोपण्याच्या तीन ते चार तास आधी घेतले पाहिजे. त्यामुळे झोपेपर्यंत तुमच्या जेवणाचे व्यवस्थित पचन होते आणि पोट हलके राहते. झोप छान लागते.

हे नियम अगदी सोपे आहेत. झोपण्यापूर्वी आपल्या बिछान्यावर येऊन वज्रासनात बसावे. तसे जमत नसेल तर सुखासनात अर्थात मांडी घालून बसावे. योग मुद्रा धारण करावी. म्हणजेच अंगठ्यासकट पहिली तीन बोटं जोडून गुडघ्यांवर हात ठेवावे. दीर्घ श्वसन करावे. निरोगी आयुष्यासाठी दीर्घ श्वसन फार महत्त्वाचे आहे. संथपणे श्वास आत घेणे आणि संथपणे श्वास बाहेर सोडणे या क्रियेला दीर्घ श्वसन म्हणतात.

ही क्रिया एसी रूम मध्ये बसून करू नये. स्वच्छ वायू शरीरात जाणे हा त्यामागचा उद्देश असतो. त्यामुळे हे आसन शक्यतो खिडकीसमोर बसून, गॅलरीमध्ये बसून, गच्चीत किंवा खुल्या अंगणात करावे. ज्यांना रात्री तसे करणे शक्य नाही त्यांनी सकाळी उठल्यावर दीर्घ श्वसन करावे. पण लक्षात घ्या, रोज पाच मिनिटे तरी शरीराला दीर्घ श्वसनाचा पुरवठा झालाच पाहिजे. तरच तुम्ही ताजेतवाने, निरोगी, उत्साही आणि दीर्घकाळ तरुण दिसू शकाल.

दीर्घश्वसनाने आयुष्य वाढते. कारण दैनंदिन जीवनात आपण जे श्वसन करतो ते शरीरासाठी अपुरे पडते. शरीराला लागणारा प्राणवायूचा पुरवठा कृत्रिमरीत्या करावा लागू नये, याची पूर्व खबरदारी म्हणजे रोजचा दीर्घ श्वसनाचा सराव. आता पाहूया दुसरा उपाय.

जर रात्रीच्या वेळी बाकीचे झोपले आहेत आणि आजूबाजूच्यांना त्रास होऊ नये म्हणून टाळी वाजवणे शक्य नसेल तर सकाळी उठून हा प्रयोग करा. आणि रात्री दोन्ही तळव्यांना थोडेसे तेल लावा आणि प्रत्येक बोटाचा छान मसाज करा. तसे केल्यानेही रिलॅक्स वाटते. ताण दूर होतो. झोप शांत लागते आणि पूर्ण होते. झोप पूर्ण झाल्यामुळे दिवसभर प्रसन्न वाटते.

दुसरा उपाय असा, की याच पाच मिनिटात दीर्घ श्वसन झाले की दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर मारून मोठ्याने टाळी वाजवा. त्यामुळे तळहातावर स्थित सर्व ऍक्युप्रेशर पॉईंट सक्रिय होतात. आणि शरीरात स्थित असलेले पंचमहाभूत सुरळीत कार्य करतात. मोठ्याने टाळी वाजवण्याने तना-मनावरचा ताण दूर होतो आणि शरीर शिथिल/रिलॅक्स होते.

तर आता व्यायामाला वेळ नाही अशी सबब देऊ नका. झोपण्याआधी पाच मिनिटं अवश्य काढा, दिलेले उपाय करा. ताजे, सात्विक आणि घरचे अन्न सेवन करा. मर्यादित जेवा, मर्यादित झोपा. भरपूर काम करा आणि हळू हळू प्रयत्नपूर्वक व्यायामासाठी वेळ काढा. जेणेकरून श्वसनाच्या उपायाला हातभार लागेल आणि तुमचे वय ओळखणे इतरांसाठी एक कोडे वाटू लागेल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

14 तास ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

14 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

18 तास ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

18 तास ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

19 तास ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

19 तास ago