शिरूर तालुका

..म्हणून पराग साखर कारखाना ऊसाला कमीत कमी ३००० रु. भाव देणार

शिरूर (अरुणकुमार मोटे): रावडेवाडी (ता. शिरूर) येथील पराग अॅग्रो फूड्स अॅण्ड़ अलाईड प्रॉडक्ट्स प्रा.लि या साखर कारखान्याने सन २०२४-२५ च्या गळीत हंगामात गाळपास आलेल्या ऊसाला कमीत कमी ३०००/- रु. प्रती टन या प्रमाणे बाजारभाव देणार असल्याची माहिती पराग साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत दळवी यांनी दिली आहे.

पराग कारखान्याचे सन २०२४-२५ चे चालू गळीत हंगामात दि. ०२/०३/२०२५ अखेर ५८००२९ मे. टन गाळप झालेले असून ६०१३७१ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. कारखाना पूर्ण क्षमतेने चालू असून कोजन व डिस्टिलरी प्रकल्प चालू आहे. कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्रा बाहेरील बाहेरील उस उत्पादक शेतकऱ्यांना चालू वर्षाच्या गळीत हंगामातील गाळपासाठी येणाऱ्या ऊसाला प्रथम हप्ता प्रती मे. टन २८०० रुपये भाव देण्यात आला आहे. तसेच सन २०२४-२५ मध्ये गाळपास आलेल्या ऊसाला कमीत कमी ३०००/- प्रती मे. टन प्रमाणे भाव देणार आहे. तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस पराग साखर कारखान्यास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत दळवी यांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

1 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago