आरोग्य

केसात कोंडा झाल्यास करा हे घरगुती उपाय

आंबट ताकाने केस धुवावेत.

करजतेल व कापूर तेल आलटून पालटून केसात जिरवावे.

वस्त्रगाळ लिंबू रस बोटाच्या टोकांनी चोळून डोक्यात जिरवावा. केस वाळल्यानंतर धुवावे.

शेवग्याच्या पानांचा रस डोक्यास चोळावा. १ तासाने डोके धुवावे. हा उपचार १ दिवसाआड ३ वेळा करावा.

२ चमचे त्रिफळा चूर्ण ४ कप पाण्यात उकळावे. थंड झाल्यावर त्या काढ्याने केस धुवावेत. आठवड्यातून दोन वेळा हा प्रयोग केल्याने केसातला कोंडा जातो. केस चमकदार होतात.

कडुनिंबाच्या निंबोळ्यांचे तेल रात्री झोपताना केसांच्या मुळात जिरवावे. आठवड्यातून १ वेळा असे ५ वेळा हा उपचार करावा.

लिंबू रस १० ग्रॅम, कापूर व हळद प्रत्येकी ५ ग्रॅम व शिकेकाई पावडर २० ग्रॅम हे सर्व पाण्यात एकत्र वाटून डोक्यास चोळावे. अर्ध्या तासाने डोके धुवावे.हा उपचार कोंडा नाहीसा होईपर्यंत करावा.

जास्वंदीची फुले खोबरेल तेलात उकळून, गाळून हे तेल नियमित डोक्यास लावावे.

व्रणशोधन तेल केसांच्या मुळांना चोळून लावावे. १ तासाने गरम पाण्याने केस धुवावेत. कोंडा नाहीसा होईपर्यंत हा उपचार करावा.

मेथीची पाने वाटून डोक्यास तासभर बांधावी.

अर्धा कप लिंबू रसात थोडी साखर मिसळून रात्री केसांना चोळावी. सकाळी डोके धुवावे. आठवडयातून २ वेळा हा प्रयोग महिनाभर करावा.

आवळकंठी व शिकेकाई पावडर समभाग घेऊन एकत्र बारीक करावी. डोके धुतांना शॉम्पू-साबण न वापरता ही पावडर पाण्यात उकळून त्याने डोके धुवावे.

आवळकंठी चूर्ण, काळे तीळ चूर्ण व माक्याचे चूर्ण प्रत्येकी ५० ग्रॅम हे सर्व एकजीव करून सकाळ-संध्याकाळ १-१ चमचा पाण्यासह २१ दिवस घ्यावे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

6 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

9 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

11 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago