आरोग्य

दुधासोबत कोणते पदार्थ खाऊ नयेत…

दूध हे पुर्णअन्न मानल जात. ते पौष्टिक तर आहेच त्यामुळे नियमितपणे आपल्या आहारात दूध असायला हव. पण दूध किंवा दुधाचे पदार्थ खाताना काही गोष्टींचं पथ्य पाळायला हवं. दुधासोबत कोणते पदार्थ खावे आणि काेणते पदार्थ टाळावे याचेही काही नियम आहेत. ते नियम एकतर आपल्याला माहितीच नाहीत किंवा मग माहिती असूनही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे मग भविष्यात आपल्याला त्वचेसंदर्भात काही आजार होण्याचा धोका असतो, असं डाॅक्टर सांगतात.

दुधासोबत खाऊ नयेत हे पदार्थ…

दूध आणि फळं एकत्र खाऊ नयेत हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे वेगवेगळ्या फळांचे मिल्कशेक पिणं आरोग्यासाठी अयोग्य आहेत. पण त्यासोबतच डॉक्टरांनी असे काही दोन पदार्थ सांगितले आहेत जे अगदी सर्रासपणे बहुतांश घरांमध्ये दुधासोबत खाल्ले जातात. त्यातला पहिला पदार्थ आहे दूध आणि पोळी. दूध आणि गहू, दूध आणि मीठ हा विरुद्ध आहार मानला गेला आहे.

आपण जेव्हा पोळ्याा करतो तेव्हा कणिक भिजवताना त्यात थोडं मीठ सुद्धा घालतो. दुधामध्ये पोळी कुस्करून खाण्याची सवय अनेकांना असते. काही घरांमध्ये तर लहान मुलांनाही दूध- पोळी खाऊ घातली जाते. म्हणजेच दुधासोबत आणि मीठ आणि गहू हे दोन्ही विरुद्ध पदार्थ आपण सर्रास खातो. यामुळे भविष्यात त्वचा रोग होऊ शकतो. तसेच दूध- भात खातानाही त्यात अनेकजण मीठ घालतात.

चहापोळी खाण्याची सवयही अनेकांना असते. या सवयी त्वचेसाठी अजिबातच चांगल्या नाहीत. आज असं खाल्लं तर उद्या लगेच तुम्हाला त्रास होईल असं नाही. या सगळ्या गोष्टी स्लो पॉईझनिंगप्रमाणे तुमच्या शरीरात काम करतात आणि कालांतराने त्याचे आरोग्यावर परिणाम दिसून येतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

7 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

22 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago