आरोग्य

खोकून खोकून छाती दुखते हे घरगुती उपाय करा

खोकल्याचा त्रास अनेकांना उद्भवतो. बरेचसे लोक खोकल्याच्या त्रासाने त्रस्त असतात. यासाठी लोक सुक्या खोकल्यावर घरगुती उपाय शोधत असतात. जर तुम्हालाही खोकल्याची लक्षणं जाणवत असतील तर काही उपाय करू शकता. खोकल्यासाठी घरगुती उपाय कोणते ते पाहूया. सतत औषधांची सवय लावण्यापेक्षा काही घरगुती उपाय करून तुम्ही खोकल्याच्या त्रासावर आराम मिळवू शकता.

खोकल्याचा त्रास दूर करण्यासाठी आलं फायदेशीर…

विनमॅक, इंटरनॅशनल हॉस्पिटलच्या रिपोर्टनुसार कफ, खोकल्याचा त्रास टाळण्यासाठी तुम्ही आल्याचं पाणी पिऊ शकता. आल्यात बायोएक्टिव्ह कम्पाऊंड्स असतात. ज्यामुळे शरीराला फायदे मिळतात. यातील बायोएक्टिव्ह कंम्पाऊंड्स आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. अलिकडेच करण्यात आलेल्या अभ्यासात दिसून आले की आल्यात एंटी इफ्लामेटरी प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे आजारांचा धोका टाळता येतो. आल्यात एंटी बॅक्टेरीअल गुणधर्म असल्यामुळे घशाचे त्रास उद्भवत नाही (Ref). मध आणि आल्याचं पाणी प्यायल्यास घश्याचा त्रास उद्भवत नाही. एक ग्लास पाणी उकळवायला ठेवून त्यात मध, लिंबू घालून नंतर गॅस बंद करा. थंड झाल्यानंतर गाळून या पाण्याचे सेवन करा.

1) खोकल्यावर आराम मिळवण्यासाठी तुम्ही गरम पाणी आणि मीठाचा वापर करू शकता. यासाठी गरम पाण्यात चुटकीभर मीठ घालून गुळण्या करा. असं केल्यानं घश्यातील त्रास, खोकल्यापासून आराम मिळेल.

२) आवळा खोकल्यासाठी उत्तम मानला जातो. आवळ्यात व्हिटामीन सी असते. ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते. तुम्ही आपल्या आहारात आवळ्याचा समावेश करू शकता. एंटी ऑक्सिडंट्सचा उत्तम स्त्रोत आहे. ज्यामुळे इम्यूनिटी चांगली राहण्यास मदत होते.

३) अर्धा चमचा मधात एक चिमूट वेलची आणि लिंबाचा रस घाला. दिवसातून २ ते ३ वेळा या मिश्रणाचे सेवन करा. हा घरगुती उपाय केल्यास खोकल्याचा त्रास दूर होण्यास मदत होईल.

४) डाळिंबाचा रससुद्धा खोकल्यापासून आराम देण्यासाठी फायदेशीर ठरतो. यासाठी तुम्हाला डाळींबाच्या रसात आल्याचा रस घालावा लागेल.

५) लसूणसुद्धा खोकल्याचा त्रास दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतो. लसूण तुपात भाजून याचे सेवन करू शकता.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago