आरोग्य

सिगारेटपेक्षाही जास्त हानिकारक असू शकतो अगरबत्तीचा धूर

विविध सण, उत्सवाची आता जोरदार तयारी सुरू झाली आहे. श्रावणात नागपंचमीनंतर एकामागून एक सण येतात. प्रत्येक घरात धार्मिक विधींमध्ये अगरबत्तीचा वापर हा हमखास केला जातो. अगरबत्तीचा सुगंध मन प्रसन्न करतो, आनंद देतो. पण त्यातून येणारा धूर आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. एका रिसर्चमधून हा धडकी भरवणारा खुलासा करण्यात आला आहे. अगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा जास्त हानिकारक आहे. ज्यामुळे आपल्याला कॅन्सर होण्याचा मोठा धोका असतो.

सिगारेट आणि अगरबत्तीच्या धुरामुळे होणाऱ्या नुकसानाचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. याच दरम्यान अगरबत्तीच्या धुराच्या नमुन्यात ९९ टक्के अतिसूक्ष्म आणि सूक्ष्म कण आढळले. या गोष्टी शरीराला नुकसान पोहोचवतात.

अगरबत्तीच्या धुरावर करण्यात आलेल्या या रिसर्चनुसार, अगरबत्ती जाळल्यानंतर धुरासोबत काही सूक्ष्म कण देखील बाहेर पडतात. हे कण हवेत मिसळतात. अगरबत्तींमधून बाहेर पडणाऱ्या विषारी कणांचा शरीराच्या पेशींवर अत्यंत वाईट परिणाम होतो.

कॅन्सरचा धोका

धुरामध्ये तीन प्रकारचे विशेष पदार्थ असतात ज्यामुळे लंग कॅन्सर होऊ शकतो. हे विषारी पदार्थ म्युटेजेनिक, जीनोटॉक्सिक आणि सायटोटॉक्सिक म्हणून ओळखले जातात. अगरबत्तींमधून निघणारा धूर आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. त्यामुळे आपल्या फुफ्फुसांमध्ये जळजळ, जळजळ आणि विविध प्रकारचे आजार होतात. अगरबत्तीच्या धुरामुळे श्वसनमार्गात जळजळ देखील होऊ शकते.

डोळ्यांसाठी घातक

अगरबत्तीच्या धुरात असलेल्या हानिकारक केमिकल्समुळे डोळ्यांमध्ये खाज सुटणे, जळजळ होणे आणि त्वचेची ऍलर्जी यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. या धुरामुळे दृष्टी कमी होण्याचा धोका देखील असतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

8 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

17 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago