आरोग्य

लसूण सालीसकट खाणे आरोग्यासाठी योग्य आहे का? जाणून घ्या

लसूण ही पोषक घटकांचे पॉवरहाऊस आहे, जी आरोग्यदायी फायद्यांसाठी ओळखली जाते. लसूण केवळ एक उत्कृष्ट प्रतिकारशक्ती वाढवणारेच नाही, तर त्वचा स्वच्छ राखण्यासही मदत करते. परंतु, लसणाचे दररोज जास्त प्रमाणात सेवन केल्याने छातीत जळजळ, अॅसिडिटी व श्वासाची सतत दुर्गंधी यांसारखे दुष्परिणाम उदभवू शकतात.

लसणाची साल खावी का.

अनेक कारणांमुळे लसणाच्या सालीचे सेवन न करण्याचा सल्ला दिला आहे. “लसणाची कळी स्वतःच आरोग्यदायी फायद्यांनी युक्त असते. विशेषत: मुख्यत: त्यातील शक्तिशाली अँटिऑक्सिडंट ॲलिसिनमुळे. हे संयुग लसूण सेवन केल्यावर खूप फायदेशीर बनवते. परंतु, लसणाची साल कागदासारखी, तंतुमय व पचण्यास कठीण असते.”

सालींमध्ये कीटकनाशकांचे अवशेष असल्याबद्दलची माहिती दिली. “कांद्याच्या सालींप्रमाणेच लसणाच्या सालीचे सेवन केल्यावर पौष्टिक हेतू साध्य होत नाही. त्यामुळे त्या टाकून देणे चांगले.

परंतु, त्यांनी लसणाच्या सालींचा पर्यायी वापर सुचवला. “त्यांना फेकून देण्याऐवजी तुम्ही त्यांना रात्रभर पाण्यात उकळू शकता किंवा भिजवू शकता आणि मग ते पाणी बागेसाठी वापरू शकता. त्यातील प्रतिजैविक गुणधर्म वनस्पतींचे कीटक आणि जीवाणूंपासून संरक्षण करण्यास मदत करतात. लसणाच्या सालींमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे व फायटोन्यूट्रिएंट्सदेखील असतात; ज्यामुळे वनस्पतींच्या वाढीला फायदा होतो.

लसणाचे फायदे कसे वाढवायचे

लसणाच्या पाकळ्या ठेचून चघळण्याची शिफारस केली आहे. “लसणामध्ये ॲलिसिन असते. त्यामधील शक्तिशाली अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इम्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे रक्तवाहिन्या विस्तारित होण्यास मदत मिळते आणि ऑक्सिजनचे सेवन सुधारते. विशेषत: प्रदूषित शहरांमध्ये राहणारे लोक, मॅरेथॉन धावपटू, ट्रेकर्स व पर्वतारोहकांसाठी ते फायदेशीर ठरते.

लसूण कोलेस्ट़्रॉलची पातळी नियंत्रित करण्यात मदत करण्यासाठीही ओळखली जाते. त्यामुळे तो संतुलित आहाराचा एक मौल्यवान भाग आहे. लसणाची साल नेहमीच्या आहारामध्ये वापरासाठी योग्य नसली तरी त्याचा कीटकनाशक म्हणून वापर करता येऊ शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

9 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

9 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

10 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

15 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

15 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

15 तास ago