संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील अंबाळा ठाकूरवाडी गावात सामूहिक विवाह सोहळ्यात जेवणानंतर मोठा अनर्थ घडला. जवळपास 600 जणांना विषबाधा झाली असून, 8 वर्षांच्या सुरेश मधे या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
17 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर तसेच करंजखेड व खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
घटनाक्रम
शुक्रवार दुपारी ४:३० वाजता आदिवासी ठाकर समाजातील आठ मुलींचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला.
संध्याकाळी जेवणाच्या पंगती सुरू झाल्या आणि 32 ठाकरवाड्यांमधून आलेल्या पाहुण्यांनी जेवण केले.
दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 एप्रिलला अनेकांना उलटी, जुलाब, चक्कर आणि पोटदुखीची तक्रार झाली.
आरोग्य व पोलिस यंत्रणांची धावपळ
घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड आणि तहसीलदार दिलीपकुमार सोनवणे यांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
विषबाधेचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू असून, अन्न व औषध प्रशासन विभागाचीही मदत घेतली जाणार आहे.
सध्याची परिस्थिती
काही रुग्ण करंजखेड ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
काही रुग्णांवर खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
गंभीर रुग्णांना छत्रपती संभाजीनगरला हलवण्यात आले आहे.
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…
ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…
बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…